Tarendra Lakhankar
PhD

Life

आज जरा जास्तीच वेळ डोळा लागला. पडद्यामागून सूर्यास्ताचं शेवटचं किरण खिडकीतून डोकावलं. आणि अंधारलेल्या खोलीत उजेड पसरला. मी खडबडून जागी झाले. घरात सर्वत्र अंधार पसरला, सूर्य जणू मी बाहेर येण्याची वाट बघत होता. अनेक वर्षात आमचं ठरलंय, आमची भेट झाल्याशिवाय तो मावळत नाही. परतीच्या प्रवासाला निघालेल्या लाल बुंद आकाशातल्या मावळतीच्या सूर्याकडे एकटक बघायला आवडतं मला. मी बोलते, भेटते, बरं वाटतं. निघालास, जा बाबा जा, दूर देशी असलेल्या माझ्या लेकरांवर सूर्योदयाचं पहिलं किरण होउन मायेचे पांघरुण घालं. तुच तर आमची प्रेरणा आहेस, कोणत्याही परिस्थितीत आपलं काम करत राहायचं तुझ्याकडूनचं तर शिकले मीआणि पोरांनाही शिकवलं. जा बाबा सातासमुद्रापार माझ्या लेकरांवर प्रेमाची पाखरण कर, त्यांच्या कर्तुत्वाचं तेचही सर्वत्र पसरु दे तुझ्यासारखं.

निरभ्र आकाशात उजेडाचा साम्राज्य पसरलं आहे तोवर आवरुण घेते. अंधारलेल्या घरात लाईटचं बटन दाबलं की दोन्ही हात आपोआप, नमस्कार करण्यासाठी जोडले जातात, त्या मानवनिर्मितीला ज्याने एका बटनवर, काळोखावर विजय मिळवला. विज्ञानाचे शोध थक्क करायला भाग पाडतात, अंगावर रोमांच आणतात.

थोडसं आवरुन, देवघराकडे वळली. दिव्याची वात वळत असताना, देव घरातला कृष्ण निरखून बघत राहातो. आणि मग क्षणात आईची आठवण मनात डोलावते, आईने पाठवणी करताना, हातात कृष्ण दिला आणि म्हणाली होती, या कृष्णाच्या रुपात तुझ्या घरातही गोकुळ नांदू दे. खरचं आईच्या आशीर्वादाने आणि तुझ्या कृपादृष्टीने, सगळं निभावलं आणि पार पडला इथवरचा प्रवास.

दिव्याच्या प्रकाशात देवघर सोनेरी रंगात चमकताना बघून मन प्रसन्न हातं. देवांचे चेहरे सोनेरी प्रकाशात झळाळून निघतात. शुभंकरोतीचा नाद घरभर पसरतो, उदबत्तीच्या सुगंधाने घर सुवासित होतं, अंगणातली तुळशीही मंद वा-याच्या प्रकाशात आनंदात डोलत राहाते, वृंदावणातल्या दिव्याने अंगण उजळून निघतं.मन आणि शरीर देवासमोर नतमस्तक होतं. माझ्या लेकरांना सुखी ठेव, ही एकच आर्जवी हाव अनेक वर्षात तोंडून बाहेर पडते आणि मी कृतकृत्य होते. “इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना”, या गाण्याने मला आजपर्यंत प्रेरणा दिलीयं. तशी माझी ओळख तरी काय होती? कोण होती मी? आजपर्यंतच्या प्रवासात कधी स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा खटाटोप केलाचं नाही. त्यामुळे स्वत:ची फारशी काही ओळख नव्हतीचं.

छोट्याशा गावात राहाणारी एका सर्वसाधारण शेतक-याची मी लेक लीला अहिरकर, शिक्षणही बेताचचं, तसं त्या काळी मुली फारशा शिकायच्या नाहीतचं. काळही तसाच होता, त्यामुळे सातवीपर्यंत शिक्षण झालेलं. लग्न झालं आणि मुंडीकोट्यातल्या लाखणकर घरात येवून मी सौं गीता लाखणकर झाले. अतिशय नाजूक परिस्थिती शहरीकरणापासुन दूर असलेल्या गावात छोटसं घर, हातावर पोट, कमावू तर खावू असं, प्रामाणिकपणे कष्ट रचायचे, मेहनत करायची आणि आलेला दिवस जगायचा. एवढं साधं जीवन. पन्नास वर्षाचा प्रवास, साधा नव्हताच. अडचणीतून, संकटातून मार्ग काढत आज आयुष्याची सत्तरी पार केली.

पाच मुल म्हणजे माझा स्वाभिमान पहिला तारेंद्र, दुसरा जितेंद्र तिसरा राजेंद्र क्रांती आणि संजय. तारेंद्र ला तारेन, जितेंद्र ला लाडाने जीतू, राजेंद्र ला बालू आणि क्रांती गट्टू तर संजयला छोटू ही आम्ही त्यांच्या जन्मापासून आम्ही ठेवलेली त्यांची नाव. पोर म्हणतात, Proud of you mom पण खरं सांगू माझी पोर म्हणजे माझा गुरुर, माझा गर्व माझा अभिमान. माझी पाचही पोरं कर्तबगार, गुणी आणि सालस.अशा कर्तबगार पोरांना जन्म देवून ख-या अर्थाने माजी कुस धन्य झाली. पोर म्हणातात, आई, दादाजी तुमच्यामुळे आम्ही घडलो. प्रत्येकच आईवडिल आपलं कर्तव्य पार पाडत असतात, पोरांना दिशा देण्याचं काम करतात, पण मार्ग मात्र त्यांनाच निवडावा लागतो, आलेल्या संकटांना, परिस्थितीला समर्थपणे त्यांना त्यांच्या बळावरच पुढे जाव लागतं. आणि माझी पोर आयुष्याच्या प्रत्येक परीक्षांमध्ये पूर्ण पैकी पूर्ण मार्कांनी पास झालीत.याचा मला आई म्हणून सार्थ अभिमान आहे.स्वबळावर इथपर्यंत पोहचली. स्वत:ची प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळख तयार केली.

आणि आज आमचीही ओळख झालीत.जन्मापासून पोरांना आईवडिलांच्या नावानेच ओळखतात, पण खरं सांगू आईवडिलांना खरा आनंद तेव्हा होतो जेव्हा आईवडिल आपल्या मुलांच्या नावाने ओळखली जातात. तो आनंद शब्दात व्यक्तच करता येत नाही. पोरांनी आज आमचं नावं सातासमुद्रापार नेलं, नाही तर कोण ओळखत होतं आम्हाला. अडचणींच्या वेळी तर अनेकदा ओळखीच्या लोकांनीही ओळख दाखवली नाही. पण आज आमचीही ओळख आहे. आई म्हणून मी खरचं स्वत:ला भाग्यवान समजते.

तीन पोर परदेशात, बाकी दोघेही आपापल्या आयुष्यात यशस्वी आहेतच. छोट्या छोट्या शुल्लक गोष्टींसाठीही ढोर मेहनत करावी लागायची त्यांना, पोरांनी कधीच कशाची तक्रार केली नाही, मेहनत केली, कष्ट उपसले. त्यांची अभ्यासाची जिद्द आम्हाला रात्रंदिवस काम करण्याची उर्जा द्यायची. अनेकदा दोन वेळच्या जेवनाचेही वांधे असायचे, पण आठवणींनी अजूनही डोळे पाणावतात, कोणत्या परिस्थीतीत दिवस काढलेत, दिवस थांबत नाहीत, प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी राहीलच असे नाही. सुख आणि दु:ख हाय जीवनप्रवास. एकटी असली ना की असं रमायला होतं, लेकरांच्या आठवणीत. सगळ्या गोष्टी कशा लख्ख आठवतात जणुकाही आजचं घडल्यात. कधी डोळे पाझरतात सुखदु:खाचे क्षण आटवून. आठवणीच त्या येणारचं.

Chapter: Aai and Decision

मुंडीकोटा, धावत्या रेल्वेचं एक छोटंसं स्टेशन. नागपूर गोंदिया पॅसेंजर ट्रेन फक्त काही मिनिटांसाठी थांबत. मुंडीकोटा फक्त ३० घरांचं छोटसं गावं. गावात आमचं घरं थोडं आतल्या बाजूला असल्याने, रस्त्याच्या कडेला आम्ही छोटसं चहाचं दुकान टाकलं होतं. दुकानात, चहा, पापडी, चिवडा आणि कधीकधी भजे विक्रिला असायचे. हे दुकान म्हणजेच आमचं उदरनिर्वाहाचं साधन होतं. गावात असलेली बिडीकंपनी तिथले लोक, शाळेचे काही शिक्षक आणि स्टेशनवरून गावाकडे ये-जा करणारे लोक हेच आमचे गि-हाईक असायचे, त्यातही गावात दोन दुकान असल्याने गि-हाईक वाटले जायचे. प्रामाणिकपणे, व्यवसाय करायचा हा आम्ही आमच्यासाठी पाडून घेतलेला नियम होता.

घर, घरातील काम, आणि दुकान सांभाळताना तारांबळ उडायची.पोर ही लहान होती, त्यामुळे दुकानाच्या मागे एक छोटीशी झोपडी बांधून घेतली, त्यामुळे दुकानाकडे आणि पोरांकडे लक्ष देण सोईस्कर व्हायचं. एकही गि-हाईक वापस जायला नको या अट्टाहासाने दुकान चालवावं लागायचं. मुलांच्या जडणघडणीत अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागले. तारेन, वर्गात पहिला यायचा, हुशार होताच. मुंडीकोटा गावात चवथी आणि मुंडीकोटा रेल्वेस्टेशवर पाचवी ते दहावी पर्यतची शाळा होती. पाहिलं तर त्याचं शिक्षण तिथेही होऊ शकत होतं. पण आपल्या मुलांना सर्वोत्तम संधी मिळाव्या या हेतूने, तोरेंद्रची अॅडमिशन मुंडीकोटा पासुन पंधरा ते वीस किलोमिटर दूर तुमसरच्या लोकमान्य टिळक शाळेत केली.

एक छोटीशी दहा बाय दहाची खोली किरायाने घेतली. सासूबाईंना तारेंनजवळ ठेवलं. चारपाच महिने झाले असतील नसतील, आणि सासूबाई आजारी पडल्या, त्यांना घरी गावाला आणावं लागलं. एकटं पोरं दहा अकरा वर्षाचं, तुमसरमध्ये एकटं राहाणं शक्य नव्हतं. उरलेलं अर्ध वर्ष कसं काढायचं, आमच्या गावातलाच एक मुलगा तुमसरला बारावीत शिकत होता, तो तुमसरलाच राहायचा त्याला ठेवून घेण्याबद्दल विचारलं त्यानेही होकार दिला. आणि तारेनेने कसबस उरलेलं वर्षे काढलं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या तारेनही पाचवीतून सहावीत गेला पुन्हा राहाण्याचा प्रश्न पडला. सहाव्या वर्गाच्या सुरुवातीलाच मी तुमसरमध्ये राहात असलेल्या माझ्या मावसबहिणीकडे तारेनला घेवून गेली, तिला अडचण सांगितली. आणि तिने तारेनला ठेवून घेतलं . फारशी ओळख नसलेल्या मावशीच्या घरी ठेवून जाताना माझ्या मनात कालवाकालव होत होती. हा निर्णय जेवढा माझ्यासाठी कठीण होता किंबहूना त्याहीपेक्षा जास्त तारेनसाठी कठीण होता.

तिथले चारपाच महिने कसेबसे निघाले असतील नसतील, एकदिवस तारेन मला म्हणाला. आई, मला इथे नाही राहायचं, का कुणास ठाऊक? पोराने, अंग सोडलं होतं. तो रोज जाण-येणं करायला तयार झाला. आणि झाला त्याचा पॅसेंजरने मुंडीकोटा ते तुमसरला जाण्या- येण्याचा प्रवास सुरु. पॅसेंजरच्या वेळा ठरलेल्या नसायच्या. मग कधी शाळेत पोहचायला उशिर व्हायचा तर कधी घरी यायला. दुपारी अकराच्या शाळेला तारेन सकाळी आठच्या पॅसेंजरनेच तुमसर गाठायचा. रिकाम्या वेळेत तिथेच स्टेशनवर बाकड्यावर बसून अभ्यास करायचा. आणि वेळ झाली की बस पकडून तुमसरला जायचा. पाच वाजता शाळा सुटली की पुन्हा बसने तुमसर आणि रात्री तुमसर वरून मुंडीकोट्याला येणारी आठ वाजताची ट्रेन बऱ्याच वेळा १०-११ किंवा मध्यरात्री यायची, कधी कधी घरी पोहचायला मध्यरात्र व्हायची, पण त्याने कधीच कशाची तक्रार केली नाही.

शिकायचं आहे तर पॅसेंजर च्या नियमाप्रमाणे चालन्याशिवाय पर्याय नव्हता. एवढ्याशा केविलवाण्या जीवाची धडपड,त्याची ती दगदग पाहून मन दूखायचं. पण पर्याय नव्हता. आम्ही दोघेही दुकानात व्यस्त असायचो, एकही गि-हाईक परत जायला नको होता, त्यामुळे पॅसेंजरने थकून भागून आलेल्या लेकराला कधीकधी डोळे भरुन बघताही यायचं नाही. दुकानातलं आणि घरचं आटोपता आटोपता लेकरं रात्री स्वत:च्या हाताने जेवून झोपी गेलेली असायची. अभ्यास करा म्हणून त्यांच्या मागेही लागायची संधी पोर देत नसतं. त्यांच्या अभ्यासाकडे बघायला वेळही मिळायचा नाही. पण पोरं पूर्ण विश्वासाने आपला अभ्यास करायची.

घरात पाचही मुलंच त्यामुळे आपापली काम करण्याची सवय लावावी लागली.मला मदत करण्याच्या हेतुने ज्याला जसे जमेन तसे पोर कामात मदत करायची. त्यामुळे स्वयंपाकापासून तर धुणीभांडी सगळीच काम मुलं हळूहळू शिकली. नंतरच्या आयुष्यात स्वावलंबनाच्या दृषीकोनातूनत्याचा त्यांना फायदाच झाला.

शाळेतल्या, कंपनीतल्या आणि स्टेशनवर रोजंदारीने काम करायला आलेल्या लोकांना स्वयंपाक करुन डबे पुरवण्याचे कामही करावे लागले. घरी शेती नव्हतीच. दुकानाच्यातुटपुंज्या मिळकतीत घर चालवावं लागायचं,दुकानात येणारी मिळकत फक्त घर चालवण्यासाठी पुरेशी होती, पण पोरांचा शिक्षणाचा वाढता खर्च पाहाताहातावर हात ठेवून दुकानाच्या भरवशावर स्वस्थ बसून चालणार नव्हतं. उन्हाळ्याच्या दिवसात, तारेंद्रचे बाबा तेंदूपत्ता वेचण्यासाठी जायचे, दोन महिण्याचे कसेबसे तिनशे चारशे रुपये मिळायचे.

दिवसरात्र कष्ट करायचे हाच मनात ध्यास असायचा. दरवर्षी होळीच्या वीस पंचवीस दिवसांच्या आधी होळीला लागणा-या साखरगाठ्या बनवण्याचं आम्ही काम करायचो, त्यासाठी गावातल्या गरीब चारपाच बायकांना रोजंदारीने हाताशी घेवून २० ते २५ दिवसात रात्रंदिवस काम करुन जवळजवळ ३० एक क्विंटलच्या साखरगाठ्या बनवाव्या लागायच्या. जवळपासच्या दुकानदारांना ठोक भावाने गाठ्या विकायचो, ठोक भावात विकलेल्या गाठ्यांचे पैसे कमी मिळतात म्हणून, पोर त्याच्या बाबांसोबत आठवडी बाजारातही गाठ्या चिल्लर भावाने विकत, एका किलोवर साधारण एक सव्वा रुपया जास्त मिळायचा. तो एक सव्वा रुपया पण त्या काळी महत्वाचा वाटायचा.

गाठ्यांमधून आलेली मिळकत आणि तेंदूपत्त्यातून मिळालेले पैसे, वर्षभ-यासाठी अडी-अडचणीवरची जमापूंजी असायची.त्यांतूनच गावातल्या बिडी कंपनीच्या शेजारची शेती ठेक्या बटईने म्हणजे किरायाने घेवून शेतीही केली. कष्टाला पर्याय नव्हताच, आणि कालांतराने एक एक पैसा जमा करुन स्वत:च्या हक्काची शेतीही विकत घेतली. शुन्यातून विश्व निर्माण करण्याचा ध्यास मनात असला ना, की त्या ध्येयाच्या बाजूने पाऊले आपोआप उचलली जातात. आमच्या बाबतीत ते अगदी खरं होतं. शरीर मेहनतीला घाबरतं नव्हतं.

आमच्या पावलांवर पाउल टाकून पोरही कष्टी स्वभावाची झाली होती.वैनगंगा नदिच्या तिरावर माडगी गावात कार्तिक महिण्यात पंधरा दिवसांची यात्रा भरायची. त्या यात्रेत आमचं फुुलपान, नारळ,पेढे, कापूर उदबत्तीच दुकान असायचं. शनिवारी रविवारी सुट्टी असली की पोरही मोठ्या जोमाने दुसरं दुकान लावायची आणि आमच्या मिळकतीत भर घालायची, निरंतर अनेक वर्षे नित्यनेमाने हे काम चालू होतं.

मला गावातलं दुकान सांभाळावं लागायचं. यात्रेतल्या दुकानाकडे लक्ष देता याव म्हणून, तारेन त्याच्या आज्जीसोबत, रात्रभर दूकानातं उघड्यावर झोपायचा. सकाळी त्यांचे दादाजी सायकलवर दुकानातलं सामान घेवून जायचे आणि तारेन सायकल उचलून आठ किलोमिटर माडगीपासुन तुमसरला शाळेत जायचा. शाळा आटोपली की पाच साडेपाचला पुन्हा दुकानात यायचा आणि रात्री तिथेच आजीसोबत झोपायचा, यात्रा संपेपर्यंत असतं चालायचं.त्यांच्याच वयाच्या इतर मुलांच्या सुखसुविधा बघुन आपल्याच वाट्याला का आली असतील एवढी कष्ट? असा त्यांनी कधी प्रश्न केला नाही. आमच्या खांद्याला खांदा लावून पोरही कष्ट करायला तयार रहायची.

मी घेतलेला प्रत्येक निर्णय, मग शेतीच्या बाबतीतला असो किंवा पोरांच्या बाबतीतला,प्रत्येक निर्णयाचं स्वागत व्हायचं. म्हणतात ना जोडीदाराची खंबीर साथ असली की मोठ्यातल्या मोठ्या संकटाची सावलीही आपल्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कुठलही काम करायची भीती वाटत नव्हती. अडचणींच्या काळात पडलोही असेल अनेकदा, अनेकदा माघार घ्यावी लागली असेल पण खंबीरपणे उभं राहाण्याची ताकद मात्र मनगटात तयार करावी लागत होती प्रत्येक वेळेस, पडण्यापूर्वी.

सुख दु:ख एका नाण्याच्या दोन बाजू. आपल्या वाट्याला काय येणार याचा विचार करण्यापेक्षा प्रामाणिकपणे आपलं काम करत राहाणं हेच परिस्थितीने शिकवलं होतं किंबहूना हेच परिस्थिती शिकवत होती. 

यातचं बिडी कंपनी बंद पडली आणि दुकानातल्या गि-हाईकांची संख्या कमी व्हायला लागली. जणू उतरती कळा आली. एव्हाना तारेन नववीला पोहचला होता, त्याचा बराचसा वेळा तुमसर ते मुंडीकोटा जाण्यायेण्यात जायचा त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नव्हता.

दुकाना पासून मुंडिकोटा गाव जवळजवळ १कि मी लांब होतं. जीतू रोज पानासाठी लागणारी २५ पैशाची सुपारी १ किमी. धावत धावत जावून घेवून यायचा. आठवड्याभ-याला लागणारी सुपारी एकाच वेळी आणून ठेवायलाही आमच्याकडे पैसे नसायचे. घाई घाईत धावताना, फुटलेले टोंगळे, लागलेल्या ठेचा, आणि मागून झिजलेल्या स्लिपर्समधून लागलेले उन्हाचे चटके, घरच्या परिस्थितीची पोरांना जाणिव कदाचित करुन देत असावेत. आमच्या नशिबाच्या पाचविला पूजलेल्या दु:खाचे चटके आपल्या लेकरांना लागू नये म्हणून त्यांना शिकवण्याचा ध्यास या आईने मनात पक्का केला होता, आणि परिस्थितीशी झगडा सुरुच होता.

माझ्या वडिलांच्या घरी चक्की होती, त्यातूनच तुमसरमध्ये आईवडिलांच्या मदतीतून एक प्लॉट घेऊन एक जुनीच चक्की विकत घेतली. आजीच्या मदतीला म्हणून बालूला तुमसरला पाठवलं. आजीसोबत बालू आणि तारेन तुमसरला राहायला गेले. आजीला पुन्हा दमा उसळला. आज्जी गावाला निघून आली. एक नौकर ठेवला पण तोही काही फारकाळ टिकला नाही. चक्की तर चालवावी लागणार होती. पुढच्या वर्षी तारेन आणि जीतूला दोघांना तुमसरमध्ये ठेवलं. दोघे भाऊच आळीपाळीने सांभाळून चक्की चालवत. पोरांनी आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा उहापोह कधीच केला नाही. आहे त्या परिस्थितीत स्वत:ला सांभाळून घेतलं. लोखंडाला वितळून लोहार ज्याप्रमाणे लोखंडाला आकार देतो त्याप्रमाणे परिस्थिती आम्हाला शिकवत होती. जशी परिस्थितीशी दोन हात करायची सवय पोरांच्या अंगवळणी पडली होती. 

चक्कीच्या कुरबुरी, इलेक्ट्रिकच्या भानगडी यातूनही त्यांची अनेकदा परिक्षा पाहीली जायची. पण त्याही परिस्थितीत त्यांनी चक्की चालवली. म्हणतात ना वेळ हा माणसाचा सगळ्यात मोठा गुरु असतो. माणसाला परिस्थिती जा गोष्टी शिकवते त्या जगात कुणीही शिकवू शकत नाही.

वाढत्या वयाची पोरं दुस-या गावात आपल्या पासुन दूर ठेवताना मनात अनेक प्रश्न पडायचे पण त्याचं उत्तर पोरांवर असलेला माझा विश्वास होता. आपली पोरं कोणत्याही परिस्थितीत वाईट मार्गाला जाणार नाही किंवा कुठलंच वाईट काम करणार नाही हा दृढ विश्वास पोरांनी आजपर्यंत सार्थ ठरवला.

Chapter: Life in Mundikota

आस्था नेहमी उभ्याने पाणी पिते. अगदी आई सारखी, हं!!! मी तारेंद्र, आस्था माझी मुलगी . लाखणकर घराण्यातल्या तिस-या पिढीची पहिली नात. उभ्याने पाणि पिऊ नये रे, तब्बेतीसाठी चांगल नसतं, आई नेहमी सांगायची. पण तिला मात्र, निवांत बसून दोन घोट पाणी प्यायला ही वेळ नसायचा, घाईघाईत घटघट पाणी आई, उभ्यानेच प्यायची.

 आई  . आई बद्दल काय बोलू? आई बद्दल लिहीताना शब्दच अपुरे पडतात. माझ्यासाठी मुंडीकोटा ते अमेरिकापर्यतचा प्रवास आईच्या पाढिंब्याशिवाय केवळ अशक्य होता. आईची पुण्याई . म्हणतात ना!! “जन्म दात्याचे ऋण फिरता फिटेना”. कोणी कितीही मोठा झाला तरी. आईवडिलांचे ऋण फेडण्याईतकं आपण कधीच मोठ होत नसतो. म्हणून त्यांच्या नेहमी ऋणातच रहावं.

आमची, आई स्वभावाने अत्यंत खंबीर होती. मायेच्या बेड्या तिने आमच्या पायात कधी अडकवल्याच नाहीत, उलट आकाशात उंच भरारी घेण्यासाठी आमच्या पंखात नेहमी आशावादाचं बळ भरलं. आम्ही घेतलेल्या छोट्या मोठ्या कुठल्याही निर्णयात, आई आमच्या सोबत असायची.

 गावात शाळा होतीच, मग मलाच का तुमसरला जावं लागणार? एक दिवस आईला सांगून टाकलं, माझे सगळे मित्र इथेच शिकणार आहेत. मलाही इथेच राहायचं? आईदादांना आणि भावांना सोडून राहावं लागणार या विचारानेच आईला नाही म्हटलं. आईने जवळ घेतलं आणि म्हणाली तुला त्यांच अनुकरण करायचं आहे की तुझं अनुकरण सगळ्यांनी करावं असं तुला वाटतं, तुला मोठ्ठ व्हायचंय ना मग? मी आईकडे फक्त बघत राहिलो.

आई नेहमी म्हणायची डबक्यातला बेडूक होऊन राहाण्यापेक्षा, वाहत्या नदीतला मासा व्हावं. पण आईने स्वप्न मात्र अथांग समुद्रातल्या माशांची दाखवली. आजही आईने घेतलेल्या काही निर्णयांची, आईच्या दुरदृष्टीची कमाल वाटते, त्याकाळी, एवढ्या छोट्या मुलाच्या बाबतीत असा दुस-या गावी शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय ख-या अर्थाने मोठा निर्णय होता.

दुकानातला चहा चांगल्याच दर्जाचा असायला हवा आईचा आग्रह असायचा. आई प्रत्येक गि-हाईकाला ताजा चहा करुन द्यायची, त्यात अनेकदा आईची खूप धांदल, धावपळ व्हायची, एक दिवस मी म्हटलं. चांगला दोनचार दहा कप, चहा करुन ठेवत जाऊया ना आपण म्हणजे, तुला प्रत्येक वेळी वेगळा चहा करावा लागणार नाही. आईने त्यावर उत्तर दिलं. आपल्या कडे आलेला प्रत्येक गि-हाईक चांगल्या चहाच्या अपेक्षेत येतो, त्या चहाचे तो पैसे मोजतो, मग त्या चहाने त्याचं समाधान नको का व्हायला? वारंवार गरम करुन कडवलेला चहा तो एकदा पिऊन घेईल, दोनदा येईल प्यायला. पण त्याला आवडला नाही तर तो पुन्हा येईल का आपल्या दुकानात.

एकदा मी चहा बनवत होतो. मी चहाच्या मापाने जरा दुध कमीच घातलं. आई निरिक्षण करत होती, म्हणाली असं का केलंस? मी हसत हसत सांगितलं, एवढ्याच दुधात जास्ती चहा करता येईल गंं. त्यावर आई म्हणाली, आपण केलेली प्रत्येक गोष्ट ही उत्तमच नाही तर सर्वोत्तम असायला पाहीजे. प्रत्येक गोष्टीचा दर्जा हा चांगलाच असावा, मग तो माझ्या हातचा स्वयंपाक असो की चहा किंवा तुमचा अभ्यास . थातूरमातूर गोष्टींनी आपल्या कार्याचा दर्जा बिघडणार असेल तर ते काम न केलेलेच बरे नाही का? आईच्या छोट्या छोट्या गोष्टीतून अनमोल असं जीवनावश्यक ज्ञान मिळायचं.

आईच्या हाताला चव होती, त्याकाळी गावात लग्न, समारंभ असले की आईला स्वयंपाकाला बोलवलं जाई, आचारी वगैरेची पद्धत एवढ्या छोट्या गावात नव्हतीच. मोठाल्या गंजांमध्ये पन्नास शंभर लोकांच्या स्वयंपाकाचा अचूक अंदाज आईला होता. चूलीपासून निमंत्रण म्हटलं की आईला स्वयंपाकाला बोलवणं असायचं, मदतीसाठी आई नेहमी अग्रेसर असायची. अशा कित्येक लग्न समारंभाच्या स्वयंपाकाची जबाबदारी आईने अनेकदा एकटीने पेलली होती.

आई प्रेमळ होती, पण अन्याय सहन करणारी नव्हती. गावात, आमच्या दुकानासमोर नवरात्रात, गावातल्या लोकांनी दुर्गा देवी बसवली, रोज आरती पुजापाठ व्हायचा. एक गुंड प्रवृत्तीचा, रांगडा माणुस तिथे रोज दारु पिऊन शिवीगाळ करायचा. पॅन्डॉल मधल्या बाईमाणसांसमोर गलिच्छ हातवारे करायचा. गावातले सगळेच त्याला घाबरायचे, म्हणतात ना “नंगेसे खुदा डरे” अगदी तसचं. आईला त्या माणसाचा खूप राग राग यायचा, पण माणसे त्याला घाबरायची,आई एकटी तरी काय करणार होती.

एक दिवस आईने गावातल्या बायकांना बोलावून, त्या माणसाला धडा शिकवायची योजनाच बनवली. तो माणूस पॅन्डॉलमध्ये आपले घाणेरडे कारणामे करायला आला तसा गावातल्या बायकांनी त्याच्या दिशेने मोर्चा वळवला. काठ्या, झाडू, हातात घेवून बायकांनी त्या माणसाला अक्षरश: बदडून काढला. आईच्या पुढाकाराने मोहीम फत्ते झाली होती. त्या माणसाला चांगलाच धडा मिळाला होता कारण नंतर तो जरा जास्तीच सांभाळून वागायचा.

मी तुमसरवरुन गावाला गेल्यावर, आईचा तो दुर्गा देवीसारखा रुद्रावतार, क्रांतीने हसून हसून गर्वाने मला सांगितला तेव्हा पासून आम्ही गमतीने आईला “झाशी की राणी लक्ष्मीबाईं” म्हणायचो. आईचा देवावर विश्वास होता. पण “प्रयत्नांती परमेश्वर” असा विश्वास. आई आपल्या कामात देव शोधायची.माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो. चांगले कर्म करा देव तुमच्या पाठिशी उभा राहील.

“दे गा हरी खाटल्यावरी असं आयुष्य कधीच नसतं”‘. देव देव करुन आयत ताट पुढ्यात येत नाही. आई नेहमी म्हणायची देवावर श्रद्धा असावी, श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. पुस्तकात विद्येचे पान, मोरपिसे ठेवून आपण हुशार होत नाही तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो हा विश्वास आईने आम्हाला दिला.

एक दिवस जीतू सायकलने कण्या आणि भाजीचे सामान आणायला गेला. आणि रस्त्यात सायकल वरुन पडला त्याने आणलेलं सगळ सामान जमिनीवर सांडल. रडत रडत आला होता तो, रडत रडत झोपी ही गेला. त्या दिवशी आम्हाला न जेवतात पाणी पिऊन झोपावं लागलं होतं. आईला सांगितल्यावर आई म्हणाली, बाळांनो कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही, आज पाणी पिऊन झोपलात ना तर एक दिवस आपल्या भरवशावर कमावलेल्या साग्रसंगीत जेवणावर आनंदाने खाऊन झोपी जालं. कित्ती खरं होतं आईचं. आलेल्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा, त्या परिस्थितीवर मात करायला शिकवायची.

आमची प्राथमिक शाळा 1 किमी अंतरावर असलेल्या मुंडिकोटा गावात होती. लहानपणापासून शाळेत पायीच जावं लागायचं. आयुष्यात शिक्षणासाठी दूर जावं लागेल? म्हणूनच कदाचित लहानपणापासून आमची शाळा दूर होती की काय? असा प्रश्न मला आजही पडतो.

आईचा आपल्या पाचही पोरांवर, डोळस विश्वास होता. आपली मुल कुढलंच वाईट काम करणार नाही हा विश्वास आम्हाला चूका करण्यापासून परावृत्त करायचा. मी पाचवी सहावीपासून, नागपूर, तुमसर, वर्धा एकट्याने निर्धास्तपणे प्रवास करायचो, उन्हाळ्याच्या सुट्टीत नातेवाईकांकडे एकटं जायचो. मला आठवतं, आमच्या गावात, म्हणजेच दुकानात नेहमी येत असलेल्या एका योगी महापुरुषाबरोबर आईने, माझ्याच मर्जीने, मला त्यांच्या जबलपूरच्या आश्रमात पाठवलं होतं. अनुशासित आयुष्याचा पाठ मी तिथे शिकलो. योगा, ध्यान ,श्लोक, स्तोत्राचं पाढांतर तसचं पहाटे उठण्याची, बसण्याची, कडक नियमावली पाळण्याची सवय मला तिथे राहिल्यामुळे लागली. पुढे आयुष्यात मी एकट्यानेप्रवास करायला कधीच घाबरलो नाही. अनोळखी जागेवर आपलं कसं होणार? हा प्रश्न मला कधी पडलाच नाही?कोणत्याही परिस्थितीत प्रवास आणि उपलब्धतेनुसार स्वत:ला सांभाळायला शिकलो.

आमच्याकडे, गरजेपुरतेच पैसे असायचे, शाळा सुरु होऊन महिने दोन महिने झाले होते, १५ ऑगस्टच्या निमित्ताने, जीतू आणि माझ्यासाठी शाळेचा ड्रेस घ्यायचा होता. त्याकाळी मोठ्यांचे छोटे झालेले कपडे लहान भावंड आनंदाने घालायचे. तसचं आमच्याकडेही होतं. आम्ही दोघेही आईसोबत शाळेचा ड्रेस घ्यायला दुकानात गेलो, एक साईज मोठाच ड्रेस आईने आमच्यासाठी पसंत केला, तशी पद्धतच होती, म्हणजे वाढत्या वयाबरोबर कपडे लगेच लहान होणार नाही या दृष्टीने.

पैसे देताना आई दुकानदाराला म्हणाली, एका ड्रेसचे पैसे उधार ठेवता येईल का? दुकानदाराने उधारी बंदच्या बोर्डाकडे बोट दाखवत नाही म्हणून सांगितले, आईने विनवणी केली, पण दुकानदार उधार न देण्याच्या निर्णयावर ठाम होता. आईचा तो नाराज चेहरा आजही आठवला की, असहाय्य वाटतं. आई झपाझप पावलं टाकत दुकानाबाहेर पडली, आम्ही दोघेही आईच्या मागे मागे चालत होतो, आईचा तो चेहरा नजरेसमोरून काही केल्या हलतं नव्हता. दुकानदाराचा रागराग आला होता, त्याने आईचा अपमान केला ही भावना मनात खोलवर रुजल्या गेली होती. आणि तेव्हाच मनात निश्चय केला, की स्वत:ला एवढं लायक बनवायचं की साध्या जीवनावश्यक गोष्टींसाठी उधारी बंदच्या बोर्डाकडे बघून दुकानातून वस्तू न घेता वापस यावं लागणार नाही.

अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आयुष्यात अनेक धडे मिळत होते? बहिणाबाई चौधरी म्हणताता “अरे संसार संसार जसा तवा चूल्ह्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर” तसचं खडतर, चटकेदार आयुष्याचा एक एक दिवस सामोर यायचा.

Chapter 3:      Train and life on Platform

नागपूर ते गोंदिया ये जा करणा-या फक्त पॅसेंजर ट्रेन आमच्या गावी म्हणजे मुंडीकोटामध्ये थांबायच्या. मुंडीकोटा स्टेशनवरून एक्सप्रेस ट्रेन धडधड आवाज करत सुसाट वेगात निघून जायच्या. मुंडीकोट्याचं प्लॅटफॉर्म फक्त नावापुरत होतं. अनेकदा ट्रेन प्लॅटफॉर्म नसलेल्या जागीही थांबायची. उंची कमी असल्याने ट्रेन मध्ये चढण्यासाठी खरी कसरत करावी लागायची. अकरा बारा वर्षाचा असेन मी, खांद्यावर दप्तराचं ओझे घेवून चढताना धड ट्रेनच्या रॉडलाही हात पोहचत नसल्याने ट्रेन पकडताना माझी तारांबळ उडायची. पाय उंच करुन करुन हात पुरवण्याच्या प्रयत्नात हळूहळू आठवीत जायेपर्यंत चांगलीच प्रॅक्टिसही झाली होती. मुंडीकोटा ते तुमसर जाण्यायेण्या करिता इनमीन तीन पॅसेंजर ट्रेन असायच्या त्यानुसार आपलं वेळापत्रक बनवावं लागायचं. दुपारी साडे अकराच्या शाळेसाठी मला सकाळी ८ वाजताची ट्रेन पकडावी लागायची, देवाडी स्टेशनवर ती साडेआठ पर्यंत पोहचून जायची. मी तिथेच प्लॅटफॉर्मवर बसून अभ्यास करायचो. शाळेची वेळ झाली की देवाडीवरुन बस पकडून तुमसरला निघायचो. बसमध्ये बसल्यावर त्यावेळी आमदार खासदारांसाठी राखीव असलेली सीट मी मोठ्या दिमाखात पकडायचो. रोजच्या सवयीने, चालत्या ट्रेनमध्ये चढण्या उतरण्याची चांगली प्रॅक्टीस झाली होती. नजरेसमोरून निघणारी ट्रेन धावत जाऊन पकडण्याची कलाही सहावी सातवीत सहज आत्मसात केली केली. हळूहळू वेळेचं गणित जमायला लागलं होतं. पॅसेंजर ट्रेनचा प्रवास करून शाळा शिकणारा त्या भागात मी एकटाच होतो. दूस-यागावी जाऊन शिकण्याची मजा, आणि काहीतरी वेगळं करत असल्याची भावना, मला इतरांपासून वेगळं करायची. दिवसभ-याची शाळा आटोपली की पुन्हा देवाडी स्टेशन बसने गाठायचो. साडे पाच ते पॅसेंजर येईपर्यतचा वेळ मला तिथेच घालवावा लागायचा. रात्री साडे आठची पॅसेंजर अनेकदा रात्री दहा अकरा वाजता यायची अशावेळी मला घरी पोहचायला खूप वेळ व्हायचा.

घर, शाळा आणि प्लॅटफॉर्म हेच माझं जग होतं. ट्रेनमध्ये चहा, समोसे, चने, पान विकणारे, तसेच प्लॅटफॉर्म वरचे कुली सगळेच माझ्या चांगल्या परिचयाचे झाले होते. काहीशे गुंड प्रवृत्तीचे, हेकेखोर, समजले जाणारे हे सगळे माझ्यासोबत मात्र छान बोलत. ठरलेल्या एका रेल्वे स्टेशन पासून तर दूस-या रेल्वे स्टेशन पर्यंतच्या भागात त्यांचं राज्य असायचं. सगळी पोर चांगल्यासाठी चांगली तर वाईटाला वाईट होती. गॅंगमध्ये एकी होती. कुणी एखाद्याला त्रास दिला तर त्याच्यासाठी धावून जातं. एकमेकांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. गॅगमधल्या एखाद्या पोरासाठी झगडण्याची त्यांची तयारी असायची. भांडण तंटे तांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण भाग होता. त्यांच्यासाठी भांडण म्हणजे काहीच अप्रूप नव्हतं. अशी अनेक भांडण सहज निपटवलेली मला बघायला मिळाली. अनेकदा त्यांची गुंडागर्दि त्यांच्या हक्कासाठी असायची, त्यांचा तापट स्वभाव हेच त्यांच्यासाठी धारदार शस्त्र होतं. त्यांची हेकोखोरी त्यांच्या धंद्याची गरज होती. कमावू तर खावू आणि ट्रेन मधली कमाई हेच त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन होतं. पण माझ्या माहितीतली सगळीच मुले मनाने सच्ची, इमानदार, सामाजिक बांधिलकी जपणारी, आणि खरी होती. त्यांच्यातला खरेपणा मला षष्यांचाकडे खुणावतं.

मैत्रिणींना मैत्र समजण्यासाठी तसा मी खूप छोटा होतो. पण कोण चांगलं आणि कोण वाईट याची पारख होती. छोटशा बाळाला जीव लावला तर तो झेपावत आणि हिडीसवाडीस करणा-याकडे मात्र इन्स्टिट्यूट बाळगू दुर्लक्ष करतं. मी तर त्यामानाने मोठाच होतो. आई नेहमीच म्हणायची चिखलाकडे कुणाचं लक्ष जात नसलं तरी कमळ मात्र चिखलातच उमलतं. आणि दुर्लक्षित चिखलाकडे आपोआप लक्ष वेधले जातं. त्यामुळे कुणालाही त्याच्या परिस्थितीने judge करु नये. आई परिसासारखी लोखंडालाही सोन्याचं महत्व आणून देणारी होती.

साप शेतक-याचा मित्र, लहानपणापासून शिकलो, ऐकलं आणि बघितलंही होतं. तो जर का चावतो तर मग तो शेतक-याचा मित्र कसा? याचा उलगडा मला हळूहळू का होईना पण व्हायला लागला होता. घाव वर्मी लागल्यावर होरपळून निघालेल्या जखमेतून रक्त निघतेच, जखम चिरघळतेच त्यावर औषधोपचार महत्वाचे नाही का? सापासारखं आणि जखमेसारखं होतं माझं. ती गुंड प्रवृत्तीची, बदमाश मुलं माझी मित्र होती. मी या बंडखोर गॅंगमधल्या मुलांसमोर अभ्यास करत बसायचो. सगळेच माझ्यापेक्षा पाच सात ते दहा वर्षानी मोठे होते.

विशिष्ट जागेत त्यांना त्यांचं काम करावं लागायचं. एका स्टेशनपासून तर दूस-या स्टेशनपर्यत त्यांचे त्यांचे ग्रुप ठरलेले असायचे. त्यांच्या भागात घुसून कुणी दादागिरी केली की त्याच्याच भाषेत त्यांनाही उत्तर द्यावं लागायचं. नविन कुणाला सहजासहजी ते आपल्यामध्ये सामावून घेत नसत. हक्कासाठी लढाई त्यांच्या आयुष्याचा भाग झाली होती. मला मात्र त्यांची कधिच भिती वाटली नाही उलट ते सोबत असताना, रात्र झाल्यावरही अनोळखी लोकांच्या गर्दीत त्यांच्या सहवासात मला सुरक्षितता वाटायची.

सगळेच गरिब होते. परिस्थितीशी झगडून, गरिबी वर मात करत होते. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांनी शिक्षण सोडून पैसे कमवायचे ठरवले होते. मला अभ्यास करताना बघून त्यांना खूप आनंद व्हायचा. कदाचित आपण करु न शकणारी गोष्ट मी करत असल्याचा आनंद त्यांना होत असावा. मोठ्या अदबीने ते माझी चौकशी करायचे. चाय!! चाय!! चाय ले लो!! चाय ले लो!! आपल्या हटके टोनिंग मध्ये ओरडताना दिपक चहावाला मी दिसता क्षणी, क्षणभर थांबून कैसे हो छोटू!! म्हणत, कधी चहासोबत बिस्किटे तर कधी समोसा खाण्यासाठी आग्रह करायचा. माझ्याजवळ बसून मी अभ्यास करत असताना माझ्याकडे एकटक बघत राहायचा. स्वत:ला परिस्थितीमुळे शिकता येत नसल्याचं शल्य त्याला कदाचित टोचत असावं. “तू पढ छोटू, पढ लिखके बडा आदमी बन! “हे त्यांचे शब्द आजही कानात गुंजतात. अशोक पानवाला, बाबा चनेवाला, मिथून चहावाला, रणजीत सगळ्यांनाच माझं कौतुक असायचं. आणि ते मला त्यांच्या नजरेत दिसायचं.

दिवसभ-याचा थकलेला मी कधी कधी दप्तरावर डोक ठेवून बसलो की, बसल्या बसल्या डुलकी लागायची. अल्लड बालपणात जबाबदारीचं पांघरुण कितीही जुकतीने पांघरलं तरी, त्यातुन अल्लड निरागस बालपण हळूवार डोकावतचं. असाच एकदा मी स्टेशनच्या बाकड्यावर बसला असताना डोळा लागला. धडधड करत ट्रेन आली आणि निघूनही गेली. मला मात्र गाढ झोप लागली असावी, मी झोपूनच राहिलो ट्रेन गेल्यावर दिपकच्या लक्षात आल. त्याने मला उठवलं, म्हणाला ” छोटू तू गया नही ट्रेन तो चली गयी”. मला कळेना काय करावं. माझी भांबावलेली, रडवेली अवस्था, कुणाकडे राहाणार, कुठे झोपणार, आणि कुठे जेवणार सगळेच प्रश्न डोळ्यासमोर तरळू लागले. अकरा बारा वर्षाचा मी कुणाकडे जाणार या विचाराने भांबानलो. ओळखीचं कुणाचं नाही आणि गावाला जावू शकेन अशी वाहतुकीची साधनही नाही. रडू आवरत नव्हतं. डोळे पाण्याने डबडबले. माझी अवस्था पाहून दिपक म्हणाला, कुछ नही छोटे, तू टेंशन कायको करता है!  . तू चल अपने घर चल. खांद्यावर हात ठेवून आधार देत तो मला त्याच्या घरी घेवून गेला. त्याचं घर म्हणजे छोटशी पत्र्याची झोपडी. परिस्थितीने खूप गरीब पण मनाची श्रीमंती त्याच्या वागणूकीत झळकत होती. शब्दात माणुसकी होती, वागण्यात आपलेपणा होता. माझं-तुझं असं काही नव्हतं अपने घरं चल!! म्हटलं आणि मी त्याच्या घरी कुठलाच इकडचा तिकडचा विचार न करता गेलोही. अनोळखी माणसांच्या गर्दीपेक्षा मला त्यांच्या झोपडीत त्याने पांघरायला दिलेली ढिगळे ठिगळे जोडून शिवलेल्या वाकळीचा (गोधडीचा) स्पर्श जास्ती आश्वासक वाटला. त्याने मला घालायला दिलेल्या त्याच्या कपड्यात त्याची दिलदार प्रवृत्ती दिसत होता.

माझ्या चार वर्षाच्या प्रवासात जवळजवळ, वेळेवर झोप न उघडल्या कारणाने दहा ते बारा वेळा ट्रेन चुकल्या, त्यानंतर मी मात्र त्याच्या घरी अगदी हक्काने जाऊन राहत होतो. आचा-याकडे काम करणारे त्याचे बाबा, दुस-याच्या पोराला कशाला आणलं? अशा प्रश्नोत्तरांचा ना भडीमार झाला ना कोणती कटकट. उलट भूक लागली असेल म्हणून माझ्यासाठी केलेला अंडाकरीचा पाहुणचार, त्यांनी आपुलकीने माझी केलेली चौकशी त्यांच्या माणुसकीची खरी श्रीमंती होती. इतने दूरसें स्कूलमें आता है पढणे के लिये म्हटल्यावर, माझ्याबद्दलची त्यांची काळजी. मी अनोळखी असूनही त्यांच्या वागण्यात कधी परकेपणा जाणवला नाही.

दिपक मला खूप आवडायचा, मी अभ्यास करताना दिसलो की, अनेकता मला चहा, बिस्किटं, समोसे आणून तुझे भूक लगी होगी म्हणत, खावू घालायचा. मी अभ्यास करत असताना माझं एखादं पुस्तक हातात घेवून चाळत बसायचा. अभ्यासाची आवड असावी कदाचित, पण परिस्थिती जे काही शिकवत होती ते पुस्तकांच्या पलटणा-या पानांपेक्षा जास्ती जरुरी असावं. ज्याचा त्याचा प्रश्न! परिस्थितीने गरीब असूनही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले माझे आईवडिल, आणि मला मिळालेली शिक्षणाची संधी हेच माझं उज्वल भविष्याचा आधार. कदाचित त्याला ती संधीच मिळाली नसेल. किंवा परिस्थिती ने ती संधी हिसकावूनही घेतली असेल? पण अशा अनेक प्रसंगातून, अनुभवातून अभ्यासावरची माझी आस्था वाढतच गेली.

शिक्षण म्हणजे पूजा . अभ्यास म्हणजे साधना आणि अभ्यासाची आवड हेच माझ्या यशाचं कारण होणार होतं. प्रयत्न केले की परमेश्वरही भेटतो. म्हणतात तोच खरं होतं.

त्या काळी, फोन नव्हतेच पोरगा शाळेतून घरी आला नाही म्हणून, काळजीने कदाचित आई रात्रभर जागी असेल. पण या वेड्या पिसाळलेल्या कोकरावर आईचाही विश्वास होता. निष्काळजीपणाचा कळस म्हणून आई रागवेल का? आईच्या आठवणीत आणि काळजीत नाराज असलेल्या मला दिपक त्या रात्री “कामचोर” पिच्चर पहायला घेवून गेलो होता. ती रात्र, तो पिच्चर अजूनही आठवणीत राहीला. असाच मी एकदोन वेळा अशोक पानवाल्याकडे ही राहिलो होतो. त्याच्या आईने वेळेवर गरम गरम खावू घातलेली भाकर, नंतरच्या माझ्या यशस्वी आयुष्यात माझ्या पदवीकडे, माझ्या यशस्वी आयुष्यातल्या मला पार्टीत दिलेल्या पंचपक्वानाच्या जेवणापेक्षा ती भाकरी अजूनही आत्मसमाधान देते. अशोक आणि दिपकच्या घरच्या जेवनासमोर पंचपक्वानाचं जेवन फिक वाटतं.

झोपडीत राहाणा-यांच्या मनाची श्रीमंती मी आज माझ्या यशस्वी आयुष्यात त्यानंतर कधीच अनुभवायला मिळाली नाही. आईलाही हळूहळू आपला लेक, स्वत:वर आलेली परिस्थिती अगदी सहज हाताळतो यावर विश्वास बसला. आणि मी अचानक येणा-या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झालो.

शाळेतल्या हिंदीच्या पुस्तकातल्या शेखचिल्लीच्या कथांचा प्रभाव असावा कदाचित, मी चहा चहा ओरडत आईच्या हातचा चहा ट्रेनमध्ये विकत असल्याचं स्वप्न मला प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर बसल्या बसल्या अनेकदा पडायचं. आणि चाय!!चाय!! चाय लो लोच्या दिपक, रणजीतच्या आवाजाने मी डोळे चोळत खडकन जागं व्हायचो. पण प्रत्यक्षात मला खूप मोठ्ठ व्हायचं होतं. पण अनेकदा मला चहा समोसेवाल्यांच्या टेक्निक्स शिकायला आवडायचं. त्यांची पळत्या ट्रेनमध्ये टढण्या-उतरण्याची कला किंवा त्यांची चहा विकण्याची पद्धत मला आकर्षीत करायची. त्यांच्याकडे बघून बघून मी त्यांच्यासारखंचं चालत्या ट्रेनमधून उतरण्याची टेक्निक शिकलो. प्लॅटफॉर्म वर गेटच्या सामोर उतरण्यासाठी आणि लांबचा फेरा टाळण्यासाठी मी गेटच्या सामोर चालत्या ट्रेनमधून सहज उतरु लागलो. धोकादायक होतं आणि आजही आहे. नकळत्या वयात काही वेगळ शिकण्याची हौस परिणामांचा विचार करत नसतेच. तेच माझ्या बाबतित खरं होतं. चहा, समोसेवाल्याचा आदर्श आणि जोश?? कुठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी, धावती बस किंवा चालती ट्रेन पकडणे, मला तो माझ्या ट्रेनिंगचा भाग वाटत होता.

गॅगमध्ये पान, खर्रा खाणारे, बिडी पिणारे अनेक मुल होते, पण मी बिघडून जाईल अशी ना आईला कधी भिती वाटली ना व्यसनाची मला कधी उत्सुकता वाटली. व्यसनी माणसांची संगत नशा करण्याचं समर्थन नाहीच होऊ शकतं. मनावरचा संयम माणसाला व्यसनापासून दूर राहाण्यासाठीचं बळ नक्कीच देतो.

एकदा मी ट्रेन मध्ये झोपलो आणि मुंटीकोट्याला मागे टाकत मुंडीकोटा क्रॉस करुन ट्रेन गोंदिया जवळ पोहचली तेव्हा जाग आली. काही केल्या आता वापस जाण शक्य नव्हतं. माझाच ट्रेन मध्ये गोंदिया ते मुंडीकोटा रोज पॅसेंजरने प्रवास करणारे एक टिचर होते, त्यांनी लक्ष असूनही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचीत त्यांनी मला सोबत चालण्याचा आग्रह केला असता तर ती रात्र मी त्यांच्या घरी आरामात घालवू शकत होतो. पण तसं झालचं नाही. आम्ही गोंदियाला उतरलो, आणि ते मला न विचारताच चालले ही गेले. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हताच, अनोळखी गोंदियाच्या प्लॅटफॉर्मवर मी रात्रभर तिथेच झोपलो. माझी चौकशी करुन स्टेशनमास्तर ने मुंडीकोट्याच्या स्टेशनवर फोन करुन घरी निरोप सागितलं होतं. सांगायचं तात्पर्य हेच की . माणुस शिक्षणाने समृद्ध होतो पण माणुसकी, एखाद्या बद्दल ची कणव मात्र त्याच्या स्वभावात जन्मजात असावी लागते.

ज्याप्रमाणे ट्रेन सुटल्यावर अशोक आणि दीपकने मला मदत केली सरांनी मला न केलेली मदत, ती गोष्ट मला आजतागायत खटकत राहाते. माणसातला माणुस ओळखण्याची, माणुसकी जपण्याची, आणि वेळप्रसंगी अडचणीत सापडलेल्याला मदत करण्याची शिकवण कदाचित मला तिथूनच मिळाली. श्रीमंत झाला म्हणून माणुस मोठा होतो असं नाही. माझे प्लॅटफॉर्म वरचे मित्र गरिब होते पण मनाने मोठे होते. त्यांच्याकडून मी खरी माणुसकी जगणं शिकलो.

रोजच घरी जायला रात्र व्हायची, कधीकधी खूप कंटाळा यायचा. पाच वाजताची एक्सप्रेस ट्रेन मुंढूकोटा क्रॉस करुन तिरोड्याला खांबांयची. आणि तिरोड्याहून पावणे सहाची पॅसेंजर पकडली की मी माझ्या गावी मंडीकोट्याला सहा वाजेपर्यंत, म्हणजे अंधार पडायच्या पहिलेच पोहचून जायचो. तसा तो प्रवास नियमात बसणारा नसायचा कारण माझी ट्रेनची पास फक्त तुमसर ते मुंडीकोटा पर्यतच असायची.

मी कधीकधी मोठ्या उत्साहात दिपक, रणजीत, आणि अशोकच्या मागे चढुन एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढायचो. ट्रेन तिकीट निरीक्षक (TT) ने पकडलं तर, मनात भीती असायची. चहा किंवा वस्तू विकणा-यांकडे TT लक्ष देत नसतं. मग तेच मित्र माझी मदत करायचे. दिपक, रणजीत, चहाच्या कॅटलीसोबत असलेली कपांची बादली मला पकडायला सांगायचे. आणि मी त्यांच्यातलाच एक होऊन ट्रेन मध्ये चाय!! चाय!! चाय ले ले!! चाय ले लो!!! ओरडायचो.

अशावेळी मी घरी लवकर पोहचायचो. सायंकाळच्या वेळी मला घरी जायला खूप आवडायचं. दिवसभर रानात चरुन आल्यावर गुराख्याच्या मागे धुळ उडवत घरी निघालेल्या गायी, म्हशीं, बक-यांचे घोळके त्यांचा गळ्यातल्या घंटीचे आवाज. सुर्योस्ताच्या वेळी आभाळात पसरलेले लाल, गुलाबी, करडे रंग. आभाळात घरट्याकडे परतणारे पक्षांचे थवेच्या थवे. हिरव्या गार झाडांची बदललेली करडी काळसर काया. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या घरातल्या स्त्रीया, त्यांनी पेटविलेल्या चूली आणि शेगड्यांचा तो धुर, तो जळणा-या लाकडांचा वास, का कुणास ठावूक मला खूप जवळचा वाटायचा. गावाबाहेर पसरलेलं अंधाराचं धुक, तुळशीजवळ मिणमिणता दिवा आणि तो सुगंधीत उदबत्तीचा सुवास. माझ्या दिवसभ-याच्या थकल्या भागल्या शरिराला क्षणभर विश्रांती देवून आत्मिक समाधान द्यायचा.

संध्याकाळची ती वेळ माझ्यावर जादू करायची. लहानपणी वाचलेली, माझ्या पुस्तकात असलेली एक कविता

वेड कोकरू . खूप थकलं

येताना घरी  . वाट चुकलं . .

अंधार बघून .भलतंच भ्याल

दमून दमून . झोपला आलं .  .

शेवटी एकदा . घर दिसलं

वेड कोकरू . गोड बसलं .  .

डोक ठेवून . गवताच्या उशीत

हळूच शिरलं . आईच्या कुशीच . .  .

या कवितेतलं कोकरु मला जवळचं वाटायचं. दिवसभर थकून-भागून घरी आलेलं ते कोकरु मला मीच भासायचो. दिवे लावणीची संध्याकाळची वेळ माझ्यावर माझ्या आई इतकीच ॉ माया करायची, माझ्यावर मायेचे अलगद् पांघरून टाकायची. त्यामुळे मी एक्सप्रेस ट्रेन ने येण्याचा बहूतेकदा प्रयत्न करायचो.

मोठ होतं गेलो तसतसं कातरवेळी सख्याच्या भेटीसाठी आतुर प्रेमिका आणि सखीच्या आठवणीत व्याकुळ तिचा सखा, कविता आणि गाण्यांनी माझ्या मनाला भुरळ घातली. आजही गावाकडे जाताना मी संध्याकाळी घरी जाण्याच्या प्रयत्नात असतो. संध्यासमयीच्या त्या विलक्षण अवर्णनीय झुंजमुंज वातावरणाचा भाग व्हायला मला आजही आवडतं.

हळूहळू पैसे वाचावे आणि एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करता यावा म्हणून, ट्रेनची पास काढणं बंदच केलं. TT ला चुकवून, त्याला हुलकावणी देवून टप्पी देवू लागलो. माझी शाळा मात्र बिना पास, बिना तिकिट सुरु होती. तुमसरच्या स्टेशनवरचे टिकीट कलेक्टर माझ्या तिकीट असण्या नसण्यावर कानाडोळा करायचे. बिनापासचा प्रवास करताना, मनातली धाकधुक माझे मित्र मला मदत करुन दूर करायचे.

शाळेला सुट्टी मारुन मी त्यांच्यासोबत १२ ते ३ पिच्चर बघायला जायचो. सिनेमा हॉलमध्ये फस्ट क्लासची तिकीट कमी असायची, त्यातही फस्ट क्लासच्या लास्ट सीटवर बसून सिनेमा बघण्याची मजाच काही और असायची. आम्ही फस्टक्लासच्या सीटवर बसून बालकणीच बसल्याचा आनंद घ्यायचो. आयुष्यात मित्राचं स्थान अढळ असते. कृष्ण सुदाम्याच्या मैत्रीचे उदाहरण देणारे पालक अनेकदा आपल्या पोरांच्या मैत्रीबाबात काटेकोर असतात. संगतीचा परिणाम होतो पण एखादा मित्र वाईट किंवा बेशिस्त आहे म्हणून लगेच आपण त्याच्यासारखं बेशिस्त होऊच अस काही नसतं. तर अशावेळी मनाचा संयम आणि आपल्या विचारांचा प्रभाव दुस-यांवर टाकता आला पाहिजे. म्हणतात ना मित्र सूर्यासारखा असावा, अंधारातून उजेडाकडे म्हणजेच सन्मार्गाच्या दिशेकडे नेणारा असावा ते काही खोटं नाही.

आजही भारतात ट्रेनने प्रवास करताना कुठलाही हायजीनचा विचार न करता, मी मनसोक्त एकावर एक चहाचे कप रिचवतो. चाय चाय करत ओरडणा-या कष्ट करुन कुटुंबाचं पोट भरणा-या, मेहनती प्रत्येक मुलात मला दिपक, रणजीत तर पानावाला अशोक दिसतो. कामाचा दर्जा आपलं व्यक्तिमत्त्व सिद्ध करत असलं तरी कु़ठलचं काम छोटं किंवा मोठ नसतंचं हे ही तेवढंच खरं. तेव्हा प्रत्येक कामाचा आदर हा झालाच पाहिजे.

गरीब श्रीमंत ही फक्त माणसाची परिस्थितीच नाही तर ती मनोवृत्ती असते. दोन्ही परिस्थिती मला जवळून बघायला मिळाली. गरिबांकडे बघण्याचा स्वतःला श्रीमंत, सधन समजणाऱ्या लोकांचा दृष्टीकोण कधी खूप केविलवाणा तर कधी खूप कठोर असायचा किंबहूना आजही असतो. आजही त्यात काडीमात्र फरक पडलेला दिसत नाही. गरिबांच्या अंगावरचे फाटलेले, मळलेले, शिवून शिवून टाके घातलेले कपडे, तुटक्या कुरतडलेल्या चपला, त्यांच वागणं, बोलण, राहाणिमान यातून कमी लेखण्याची एक संधीही लोक सोडत नाहीनाही, ही शोकांतिकाच नाही का? श्रीमंत गरीब, समाजातल्या या दोन स्तरांची एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही. उच्च शिक्षित श्रीमंतांना, गरीब अशिक्षित समजल्या जाणा-या लोकांशी उद्धटपणे वागण्याची आयती चालत आलेली संधी वाटत असावी बहूधा. खचलेले गरीब परिस्थितीने कोचंमबलेले बाहेरच्या जगाशी लढताना मात्र लवकर हार मानतात किंवा मुजोरी करुन टिकण्याचा प्रयत्न तरी करतात. आपल्याला कवडीचीही किंमत नसलेल्या या जगात, त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरु होते. आपल्या वाट्याला येत असलेली हेळसांड, समाजाकडून त्यांना मिळत असलेली हिन वागणूक, याविरुद्ध समाजाबद्दल चीड त्यांच्या मनात खदखदत असते. ना त्यांना घरात आदराचं स्थान असतं ना त्यांना बाहेरच्या जगात सन्मानाने वागवलं जातं. त्यातूनच जन्म घेते त्यांची स्वत:चं अस्तित्व शोधण्याची लढाई.

आपल्या बरोबरीचे दहा पाच समविचारी लोकांचं जग त्याचं विश्व होऊन जातं. आणि ख-या अर्थाने त्यांच्या विचारशक्तीला बळ मिळतं. आपल्या मागे कुणीतरी आवाज उठवणारं ,आपल्यासाठी झगडणारं आहे ही भावनाच त्यांना समाजात सुरक्षितता प्रदान करते. त्यांच्यातली सुरक्षितता, त्यांच्यातली एकी मात्र जगात त्यांना गुंड, फुकट बिनकामाचे, कामचुकार, म्हणून त्यांना नव्याने ओळख देते. त्यांच्यावर हमखास डाफरले जाते. गल्लीतले, नाक्यावरचे गुंड म्हणून त्यांचा अनेकदा धिक्कारले जाते. ट्रेनमध्येच चहा विकणारा दिपक असो किंवा अशोक, ए लडके चाय दे रे!! ओरडून, उद्धटपणे चहा मागितल्यावर, त्यांच्याकडून चहा घेणारे त्याच्यावर उपकार करत असल्याचं चित्र अनेकदा दिसतं.

या लोकांकडे, खूप जवळून बघितल्यावर जाणवतं की ते गुंड नव्हतेच, तर ते आपल्याच अस्तित्वाची लढाई लढत होते. अगदी साध्या वाटणा-या छोट्या गोष्टींसाठी त्यांना झगडावं लागतं होतं. दोन शब्द प्रेमाचे त्यांच्या वाट्याला कधी येतच नव्हते. एक रुपयाच्या कटिंग चहासाठी लोकांची अनेकदा त्यांना बोलणी खावी लागायची. चहा द्यायला लागलेला वेळ असूदे किंवा थेंबभर चहाचं सांडणं असू दे त्यांची चूक पोटात घालणारे समाजात आढळून येत नाही. स्वत:ला सुशिक्षीत समजणारे, गरिबांना कित्ती हिनपणे वागवतात याकडे सुशिक्षित समाजाचं कधी लक्षच जातं नाही.

एक शब्दही ज्याच्या वाट्याला आपुलकीचा येत नाही त्यांच्याकडून मात्र आपला समाज, त्यांनी प्रत्येकाशी चांगलं सोशिकपणे वागण्याची अपेक्षा करतो हा आपल्या समाजाचा विरोधाभास नाही का. स्वत:वर अन्याय होवू नये, म्हणून अन्यायाच्या विरोधात स्वत:च्या न्यायासाठी झगडणा-या गरीब पोरांना आपणचं गुंड म्हणून नावारुपास आणत असतो. गरीब किंवा गुंड म्हणून कुणी जन्माला येत नसतं हे मात्र सर्रास विसरले जातं.

म्हणतात पेरले तेच उगवते. मग ज्याच्या वाट्याला नेहमी उपेक्षितपणा आणि सततची हेळसांड आली त्याच्याकडून आपण समजूतदारपने वागण्याची अपेक्षा का करावी? अंगावर फुस्कारलेला साप प्रत्येक वेळी जहरी असेलच असं नाही. तर दुस-यावर फुस्कारने त्याचा जन्मजात स्वभाव असतो. मात्र समाजात जीथे सापाला शेतक-याचा मित्र म्हणून पूजले जाते तिथेच साप दिसला की मार दगड ही मानसिकता ही याच समाजाची. आणि तसचं जगणं गरीबांच्या वाट्याला येतं. ही जनता समाजाचा मोठा हिस्सा असूनही समाजात दुर्लक्षितच राहिली. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क मोठ्या संख्येने बजावणा-या जनतेचा ख-या अर्थाने कु़णी वालीच नसतो.

जवळजवळ साडे पाच वर्ष मी त्या मुलांसोबत राहिलो, त्यांना अगदी जवळून बघायला मिळालं. पण त्यांची गुंडागर्दी त्यांच्या हक्कासाठी होती, तेच मला जाणवलं. ट्रेनमध्ये आपल्या निर्धारित सेशन अंतर्गत चहा विकण्यासाठी करावी लागणारी मुजोरी, मारापिटी त्यांच्या हक्कासाठीच असायची. शाळेत दुपारचा डब्बा खावून झाल्यावर, कधीकधी संध्याकाळी खूप कडाडून भूक लागायची. टपरीवरच्या समोस्याचा खमंग सुवास दरवळायचा मात्र खायला जवळ पैसे नसायचेच. कधीतरी अचानक खमंग सामोसा किंवा भज्यांच्या कागदाची पुडी अगदी चालता

चालता माझ्या हातात कधी दिपक चहावाला तर कधी अशोक पानाला ठेवून जायचा. त्यांचातला खरेपणा, त्यांच्यातला चांगुलपणा मला ते गरिब नाही तर मनाने किती मोठे होते हेच दाखवून जायचे. मला त्यांना जाणता आलं कारण मी ही त्यातलाच एक गरीब कुटुंबाचा भाग होतो. फरक फक्त एवढाच, मी माझी जगण्याची धडपड, शिक्षणाने कमी करण्याचा प्रयत्न करणार होतो तर त्यांनी शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग अगदी लहान वयापासूनच निवडला होता . आईदादांमुळे माझं शिक्षण शक्य झालं कदाचीत त्यांना ते शक्य झालं नसावं.

प्रत्येक मैलामैलावर भाषा बदलते त्याचप्रमाणे खाणपाणाच्या, राहण्या-वागण्याच्या पद्धती बदलतातच, हा निसर्गनियम. शहर आणि खेडे यात खूप मोठी दरीं असल्याच जाणवलं. चवथीतून पाचवीत अगदीच खेड्यातून आलेलो असल्याने तुमसरमध्ये आल्यावर मला सुद्धा तो अनुभव आलाच. शिक्षणाने स्वतःला सिद्ध करणे एवढेच काय ते मी करु शकत होतो. पाचवीत वर्गात तिसरा आलो, आणि सहावीत वर्गाचा कॅप्टन झालो. सर्वसाधारण हुशार म्हणजे वर्गात पहिल्या पायात येणारे किंवा हात वर करुन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पटकन देणारे तर अगदीच गब्बू मुलं शाळेत आपल्या सरांच्या लक्षात राहातात. त्यामुळे मला निखाडे सरांच्या मनात घर करण्याची संधी मिळाली. निखाडे सर माझे क्लास टीचर होते, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. स्कॉलरशिप चे क्लास आमचे गणिताचे धांडे सर घ्यायचे. सगळ्यांनीच त्यांच्या कडे क्लास लावला होता. निखाडे सरांना माझी अडचण सांगितल्या लगेच त्यांनी मला अभ्यास करायला घरी येत चल मी शिकवेन तुला म्हणत मला आधार दिला. मी स्टेशनवरून साडे आठ वाजता थेट त्यांच्याकडे जाऊ लागलो. स्कॉलरशिपचा क्लास करुन, मग शाळेत जायचो, माझ्याकडून त्यांनी ट्युशनचे काहीच पैसे घेतले नव्हते. आज फक्त पैशासाठी शिकवणा-या, समाजात गुरुंचं चित्र बदललं असलं तरी, त्याकाळी कुठल्याही गुरुदक्षिणेविणा शिकवणारे निखाडे सर आठवणीत उच्च स्थानावर राहिले. त्यांच्या घरी निखाडे मॅडमनी मला खूप जीव लागला. क्लास संपल्यानंतर जेवनाचा आग्रह तर कधी माझ्या अडचणीच्या वेळी मला राहाण्यासाठी, रहायला आणखी एक हक्काचं घर निखाडे मॅडममुळे मला मिळालं. मी त्यांच्या घरी ही राहायचो. त्यांचा मुलगा उमेश माझा चांगला मित्र होता. मी, सरांचा मुलगा उमेश, सुशील, प्रविण आमचा मित्रांचाही शाळेत एक ग्रुप तयार झाला. निखाडे सर असेपर्यंत, अमेरीकेला आल्यानंतर ही माझं तुमसरला जाण झालं की मी आठवणीने सरांना भेटायला जायचो. आपला विद्यार्थी खूप मोठा झाला, अमेरिकेत गेला त्याचा अभिमान त्यांच्या चेह-यावर दिसायचा.

मला नवनविन गोष्टी शिकायला आवडतं होतं. माझ्या मन वेगापेक्षा क्षणात टिपायच. माझं डाखमा, म्हणजे डाव्या हाताने लिहीणारा, लेफ्ट हॅन्डेड लोक मला वेगळे भासत. त्यांच्याबद्दल मनात खूप आपुलकी असायची. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना आनंद देवून जायची. गावातल्या बिडी कंपनीत चहा द्यायला जायचो तेव्हा चहा वाल्यांची एक पद्धत आत्मसात केली. जितु आणि मी दोघेही, एका हातात सहा ते सात कप पकडून, दुसऱ्या हातात असलेल्या चहाच्या केटलीने एक एक कप सरळ करुन गि-हाईकाला कपात चहा ओतून द्यायचो. काहीच दिवसात निष्णात अनुभवी चहावाल्यासारखं आम्ही करु लागलो. ते ही एक कौशल्य होतं, तसं करताना कपांची होणारी किणकिण, तर केटलीतून कपात चहा ओतताना होणार सुर्र सुर्र आवाज क्षणात अनेकांच लक्ष वेधून घेत. आमच्या त्या कौशल्यामुळे, चहावाला म्हणून आम्हाला नव्याने ओळख दिली गेली. बिडी कंपनीतून आम्ही पुठ्ठयाचे कव्हर आणायचो आणि तेच आम्ही आमच्या पुस्तकांना लावायचो. मुंटीकोटा शाळेत चहा द्यायला गेलो की वर्गातले खडूचे तुकडे उचलून गोळा करण्याचा छंदही जोपासला.

त्याकाळी आजच्यासारखे घरोघरी TV नव्हतेच. मला वाटतं कुठल्याही गोष्टीसाठी संयम ही त्या पिढीची खरी ओळख होती. आमच्या गावात एकच TV होता, त्यामुळे त्यांचेकडे गावातले सगळेच लोक TV बघायला जात असू त्यात बुधवारचा ८.३०चा चित्रहार, माझ्यासाठी स्पेशल असायचा. चित्रकार वेळेवर बघता यावा म्हणून, मी बुधवारी एक्सप्रेस ट्रेनने येण्याचा प्रयत्न करायचो, आणि साडे सहा पर्यंत गावात पोहचायचो.

मी खूप फस्ट डे फस्ट शो पिच्चरचा फॅन आहे . छंद जोपासण्याकडे माझा लहानपणापासून कल होता. छंदातून मिळणारी आत्मशांती माझं आत्मबल वाढवायची आणि जगण्याला नवी दिशा द्यायची. चांगलं वाईट सांगता येणार नाही पण. चक्की चालवायला लागलो आणि तेव्हापासुन पिच्चर शौकीन झालो. टॉकीजमध्ये पिच्चर बघायला खूप आवडायचं, तो माझा छंदच झाला. कुठलीही कला, किंवा कुठलाही छंद, आयुष्याला बघण्याचा नवा दृष्टीकोन देतो. आयुष्यातल्या त्याच त्याच पणाला कंटाळून तेच तेपण आत्मसात करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीत मन रमवून, पुन्हा नव्याने तेच ते आयुष्य जगण्यासाठीची उर्मी “कला” देत असते असे मला वाटतं. माझ्या भाषेत म्हणाल तर “क्षणभर विश्रांती” म्हणजे कला . तेव्हा एक छोटासा pause सगळ्यांना घेताच आला पाहिजे. आज मी प्रामाणिकपणे सांगतो, अनेकदा मी शाळेला बुट्टी मारुन शुक्रवारचा फस्ट डे फस्ट शो बघायला जाण्याचा प्रयत्न करायचो. अनेकदा पिच्चर बघण्याच्या निमीत्ताने स्टेशनवरच्या मित्रांना भेटण्यासाठी ची केविलवाणी धडपड़ असायची. त्यावेळीच ते वागणं कित्ती बरोबर कित्ती चूक मला माहिती नाही पण आपण केलेल्या काही चूक गोष्टींचं समर्थन न करता मी त्यातून काय कमावल याकडे मी लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे अपराधीपणाची सल मनात टोचत नाही. त्या दिवसांची आठवण जगत आजही मी अनेकदा, अमेकीरेतही शुक्रवारचा फस्ट डे फस्ट शो मुव्ही थिएटरमध्ये आवर्जून बघायला जाण्याचा प्रयत्न करतो.

माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. लहानपणी मला न आवडणा-या भाज्या आई का करते? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. जेवण नाकमुरडे मारत नाही तर पोटाची भूक मिटवण्यासाठी करावं आई नकळत सांगून जायची. हळूहळू मीच माझ्या आवडी निवडीवर विचार करायला लागलो. जेवण तोंडाच्या चवीसाठी म्हणून नाही तर पोटाची भूक मिटवण्यासाठी करायला हवं. न आवडणारी भाजी असली की जेवण न करता दिवसभर उपाशी राहून रात्री तीच भाची खाण्याचा प्रयत्न केला आणि खरच नावड आवडीत बदलली. खरं सांगायचं तर पोटाच्या भुकेला आवडी निवडी नसतातच, सगळेच ह्या जीभेचे चोचले. एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून शिक्कामोर्तब करण्यापेक्षा पोटात भुकेचे कावळे ओरडल्यावरच खायला शिकायला पाहिजे म्हणजे तुमचा ताटातल्या जेवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्की बदललेला दिसेल हे मी खात्रीने सांगतो.

अमेरीकेच्या या लाईफस्टाईल मध्ये आजही रोजच्या जेवणात असलेल्या कण्याच्या भाताची आणि सणासुदीला भरपूर कांदा घालून केलेल्या खाकसच्या भाजीची आठवण येतेच येते.

अगदी तसाच अनुभव, अनेकदा माणसांबद्दल ही येतो. एखाद व्यक्तीमत्व क्षणात मनाला भावतं तर अनेकदा एखाद्याला बघून उगाचच चिडचिड होते. त्याचं येण, अचानक भेटण किंवा त्याचा एक फोन कॉल सुद्धा कंटाळवाणा वाटतो. पण त्याने कधीकाळी केलेली छोटीशी मदत किंवा दिलेला मोलाचा सल्ला, आपल्या मनात त्याची वर्षानुवर्षे जपलेली छबी, बदलला कारणीभूत ठरते. आपल्या मैत्रीच्या कप्प्यात नसलेली ती व्यक्ती अनेकदा जीवश्च कंठश्च मैत्री म्हणून जपली जाते. त्याचं आपल्या सोबत असणं महत्वाचं वाटू लागतं. ती व्यकीत, व्यक्तीमत्व तेच असतं पण बघण्याचा दृष्टीकोन बदलला की आवड निवडही बदलते.

एकाद वेळी करायला काहीच नाही म्हणून आपण खूप बोअर होतो . कंटाळा येतो. कधीकाळी कंटाळा येतोय म्हणून ठेवलेलं तेच काम आपला कंटाळा दूर करण्यासाठी महत्वाचं ठरतं. मानायला थोडं अवघड होईल पण सत्य आहे. एखादा पिच्चर आवडला नाही म्हणून अर्धवट सोडून दिलेल्या त्याचं पिच्चर मध्ये अचानक कधीतरी जीवनाचा सार दडल्याचं लक्षात येतं.आणि तोच कंटाळवाणा पिचलेल्या रस घेवून बघितला जातो. विरंगुळा, छंद माणसाला नवी दिशा देतो, बघण्याचा नवा दृष्टीकोण देतो. मी आवडी निवडी बाजूला ठेवून स्वत:ला त्या साचात टाकण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात नंतर मी प्रत्येक खेळ अगदी मन लावून आवडीने खेळलो. कुठलाही खेळ फक्त खेळायचं म्हणून नाही तर स्पर्धा म्हणून त्या खेळाकडे बघायला लागलो. प्रत्येक खेळाचे डावपेच, नियम, आणि संधी आयुष्याला कलाटणी देण्यासाठी आवश्यक आणि उपयोगी ठरतात. कॉलेजमध्ये मी चेस चॅम्पियन होतो, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, स्केटिंग, क्रिकेट, बॅडमिंटन प्रत्येक खेळात त्या त्या वेळी मी माझा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. अनेक मेडल्स आपल्या नावावर अधोरेखित केली, कौतुकाची छाप पडली. त्यामुळे खेळाचं स्थान आपल्या आयुष्यात अढळ असावं.

Chapter 4:      Tumsar Chakki and Education

मी नववीत गेलो तसं मुंटीकोट्यावरुन येण्याजण्यात उगाचच वेळ जाईल म्हणून आईने मला आजी आणि बालू (तिसऱ्या नंबर चा भाऊ) सोबत तुमसरला ठेवण्याचा निर्णय घेतला. पण दोन घरांचे खर्च काही परवडणारे नव्हते, त्यामुळे काहीतरी वेवसाय नवीन घरी टाकायचे ठरवले. आईचे वडिल आमचे आजोबा खूप मेहनती, मेहनतीच्या बळावर त्यांनीही चक्की घेवून आपल्या व्यवसायावर चांगला जम बसवला होता. आई दादाजींनी पुन्हा एक निर्णय घेतला. आजोबांच्या मदतीतून एक जूनी चक्की विकत घेतली. जूनी असलेल्या कारणाने ती मधूनच दळण देता देता बंद पडायची. मोटर खूप गरम झाली की चक्की बंद पडायची त्यामुळे ती १० पंधरा मिनिटं सतत चालली की तिला आपणहून बंद करावी लागायची. एवढी सतर्कता पाळावी लागायची. चक्की चालू होताना तर त्रास द्यायची, देवाचं नाव घेवून कशीबशी सुरु झालेली चक्की मध्येच बंद करण्यात जीवावर यायचं पण पर्याय नसायचा. विकणा-याने खरं तर त्रासूनच विकली असावी, आणि आम्ही तीच चक्की विकत घेतली होती. तिच्या त्रासासहित .

एक वर्ष कसेतरी ढकलल्या गेले. आजीची तबियत साथ देत नव्हती मंहून ती आणि बाळू ची मुंडीकोटा रवानगी झाली. जितू (दुसऱ्या नंबरचा भाऊ) ह्याचा दहावीचा शिक्षणा करीता माज्या सोबत तुमसरला राहू लागला. दळता दळता मध्येच बंद पडलेली चक्की कधीकधी सुरुच होत नव्हती. खूप त्रास व्हायचा. आजच्या सारखी फोनची सुविधा नव्हतीच, सायकल उचलून २ किमी दूर असलेल्या इलेक्टिशियनच्या घरुन त्याला बोलवून आणावं लागायचं. तो आला की चक्की बरोबर झाल्यावर दळण दळले जायचे. अशावेळी गि-हाईकाला थांबवून ठेवणं, त्याच्या प्रश्नांना उत्तर देणे कठीण जायचं. चक्की बंद पडल्यानंतर ती परिस्थिती हाताळणं म्हणजे आमच्या सहनशक्तीची खरी परीक्षा असायची. गिहाईक तुटू द्यायचे नाहीत अस वागावं लागायचं. अनेकदा मनात राग येवून त्याच त्याच प्रश्नांना उत्तर देवून चिडचिड व्हायची पण त्याही परिस्थितीत गोड गोड बोलाव लागायचं.

गरम झालेल्या मोटरचं, चक्कीवर दळलेलं पिठही जळायचं. बऱ्याच वेळा मोटर गरम होते म्हणून आम्ही मोटरवर पाण्याने ओला केलेला कापड किंवा बोरा ठेवायचो. ओलं कापड किंवा बोरा इलेक्ट्रिक मोटार वर ठेवणे किती धोकादायक आहे हे आम्हाला नंतर कळले. कुठलीही दुर्घटना झाली नाही हेही आमचं नशिबच. चक्की बुधवारी बंद असायची. पण आम्हाला मोकळीक नसायची. कारण त्या दिवशी चक्कीच्या आतला भाग साफ करावा लागायचा. पाटयाला टांचवावं लागायचं. आणि हे काम खूप कठीण आणि वेळखावू असायचे. पाटयाचे टांचन व्यवस्थित झाले तरच दळन बरोबर बारीक आणि चांगले दळले जायचे, नाहीतर चक्कीला पुन्हा खोलून पुन्हा नव्याने दुरुस्त करुन जोडावे लागायचे. चक्कीच्या पाट्यावर हतोड्याचे घन पाडून बारिक गड्डे करावे लागायचे, खूप मोठी कसरत असायची. तीही एक कला होती, नाजूक हाताने हळूवार सावधानी बाळगून सगळ करावं लागायचं. चक्की टाचवणारे बुधवारी खूप व्यस्त राहात, जाण्यायेण्याच्या त्यांच्या वेळा सांभाळता सांभाळता नाकीनऊ यायचं. त्यांच टांचण बघून बघून काही दिवसात हळूहळू जितू चक्कीच्या कामात एक्स्पर्ट झाला होता. चक्की टाचवून झाली की पाटा बरोबर लावावा लागायचा. पहिल्या दुस-या दळणात हमखास टाकलेल्या दगडाचा बारिक चूरा येवून दळण कचकच व्हायचं. ते टाळण्यासाठी आम्हाला बुधवारीच त्यावर धान दळून ठेवावे लागायचे. बुधवारी चक्की बंद असूनही आमचा बुधवार चक्कीच्या कामातच जायचा. तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोठमोठाले शोध लावले असले तरी काही गोष्टींसाठी मात्र हातमेहनत आणि सहनशक्ती ची कसब दाखवावी लागते.

चक्की असूनही सगळ्या प्रकारचे प्रश्न सुटून पैशाची रेलचेल असेल अस नव्हतं. आम्हाला पैसे सांभाळूनच वापरावे लागायचे. रोजचं स्वयंपाकाचं सामान रोजचं आणावं लागायचं. १ रुपयाची खाकस आणायचो आणि २ कांदे टाकून रस्सा भाजी बनवायचो. सनासुदिच्या दिवशीची तर कधी रात्रीच्या जेवणातील तीच आमची आवडती डिश झाली असायची, आम्ही दोघेही ती खाकसची भाजी खूप आवडीने बनवायचे आणि खायचो. छोट्या आणि आवश्यक गोष्टींवर समाधान मानायचं आम्ही चांगल्याप्रकारे शिकलो होतो.

चक्कीवर काम करण्याचे आम्ही दिवस ठरवलेले होते. तीन दिवस एकाने चक्की चालवायची तर दुस-याने घरातली, स्वयंपाक, धुनी, भांडी आणि दूस-यांच्या विहीरीवरुन पाणी आणाणे ही काम करायची. त्यामुळे एकावर कामाचा बोजा पण होत नव्हता आणि, कामाचं नियोजन व्यवस्थित व्हायचं.

अधुनमधून दादाजी तुमसरला यायचे. शनिवारी किंवा रविवारी ते आले की आम्हाला खूप आनंद व्हायचा . दादाजी आले की चक्की सांभाळून घेत, त्यावेळी आम्ही क्रिकेट खेळायला मोकळे असायचो. छोट्या छोट्या गोष्टीतून आभाळाएवढा आनंद कसा शोधायचा हे आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीतूनचं तर शिकत होतो. घराजवळच्या बांगळकर प्राथमिक शाळेच्या पटांगणात खेळलेली क्रिकेट, ते दिवस, ते मित्र आणि जबाबदारी पेलता पेलता स्वत:चा घेतलेला शोध? हम भी कुछ कम नही। च्या आविर्भावात मारलेले सिक्सर्स आणि चौके. लेफ्ट हॅन्डेड बॅटमन असल्याने मला क्रिकेट खेळताना थोडं जास्तीचं प्राधान्य मिळायचं, आणि मी त्या संधीचं सोन करायचो.

बारिक-चूरिक पोरं चक्की चालवून शिकतात, पाहून काही लोकांना कौतुक होतं. आम्ही अभ्यासातही चांगलं होतो आणि मेहनत करून शिकायचो त्यामुळे आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण कौतुकास्पद होता. ती लाखणकरची पोर बघा मेहनत करुन शिकतात, घरोघरी आमच्या वयाच्या मुलांना आमचं उदाहरण दिलं जायचं. आपण दुस-यांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण कुणाच तरी प्रेरणास्थान व्हावं, आईने लहानपणी डोक्यावरुन हात फिरवत म्हटलेलं वाकय मनावर ठसठशीत कोरलं गेलं, ते अजूनही मी अवलंबतो. काही लोक कौतुक तर काही मस्तीखोर पोर कधी त्रासही द्यायची. चक्कीवाला चक्कीवाला म्हणून चिडवायची. आमची मेहनत, अभ्यास यातून त्यांचा जळफळाट होत असावा कदाचित, आम्ही मनावर घेत नसू पण कधी कधी चिडचिड व्हायची.

आमच्या बाजूच्या घरी लेदे फॅमिली राहायला आली होती. क्रिष्णा नावाचा बारकासा मुलगा जितूच्या वर्गात होता, तो लगेच आमच्या गॅंग मध्ये शामिल झाला . अन्याय करणा-यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो म्हणतात त्याप्रमाणे आम्हीही त्यांना उत्तर द्यायला लागलो. जीतूने तर त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी कराटेचे ट्रेनिंगही घेतले. भांडण वगैरे करण्याची फार वेळ आली नाही. पण एकदा जीतूने आणि कृष्णाने मिळून एका डाबला मुलाची चांगली धुलाई केली होती. ती आठवली की अजूनही गदागदा हसायला येत. आम्हीही तुमसरमध्ये आमच्या मित्रांचा एक चांगला ग्रुप तयार करुन त्यांना दम द्यायला लागलो होतो. आम्हीही त्यांना उत्तर द्यायला लागलो. त्यादिवशी पासून मात्र वस्तीतल्या पोरं आमच्याशी पंगा घ्यायला घाबरतं. फार कुणी आमच्या वाट्याला जायचे नाही. आणि आमचंही त्या वस्तीत वर्चस्व वाढायला आणि सगळे आमच्याकडे चक्कीवाला म्हणून नाही तर आदराने बघायला लागले होते.

आपण एकटे असलो की, समाज आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. छोट्या मोठ्या गॅंग सगळीकडे असतात. नविन आलेल्या, एकट्या किंवा कमजोर लोकांना दाबण्याचा प्रयत्न अशावेळी केलाच जातो. विनाकारण चिडवणे, डिवचणे, असे प्रकार सर्रास बघायला मिळायचे आणि आजही मिळतात. आपल्या पेक्षा कमजोर, नविन, आणि साध्या लोकांना सांभाळून घेण्याची, शिकवणच घरातून दिली जात नाही. बहुतेक सर्वांच्या घरी असेच वातावरण असत. घरातल्या लहानांनी काहीही सांगितले, आपले मत मांडले की तुला काही समझत नाही, म्हणून चूप बसवले जाते? त्याला काय वाटेल याचा विचारच केला जात नाही. आपल्या पेक्षा छोट्यांवर, एकट्यावर दबाव आणण्याची शिकवण त्यांना घरातूनचं दिली जाते. आणि त्यातूनच दूस-यांनर वर्चस्व गाजवण्याची आणि आपला घरातला राग बाहेर काढण्याची सवय लागते.

आमचं घर मात्र याला अपवाद होतं. त्या मानाने आम्ही खूप नशिबवान होतो. आई वडिलांनी आम्हाला “तुला काही समजत नाही” असे कधीच म्हटले नाही. आमच्या विचारांचा आदर, आणि सगळ्यांचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला आमच्या घरातून चे मिळाली. त्यामुळे आपल्यापेक्षा कमजोर लोकांना कमजोर म्हणून सोडून देण्यापेक्षा त्यांना आपल्या टिममध्ये घेवून त्यांना समजावून त्यांच्यातल्या चांगल्या बाजूच्या दृष्टीने विचार करायला लावणं, हे आम्ही लहानपणापासून करू लागलो.

आईबाबा तुमसरला शिफ्ट होईपर्यत आम्ही भाऊ भाऊच, तुमसरला राहायचो. पैशाचं व्यवस्थापन वगैरे आमचं आम्हीचं सांभाळायचो. छोटी मोठी नोकझोक व्हायची पण, भावाभावांमध्ये मतभेद असे कधीच झाले नाही. एकदा आठवतं, तुमसरमध्ये बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेली होती. आणि दोघेही सेमी फायनल मध्ये पोहचलो. जिंकलोही. जीतूने मोठ्या मनाने मला फायनलमध्ये जाऊन जिंकून बुद्धिबळाचं बक्षिस घेवून ये म्हणून सांगितलं. छोटा असून मोठ्या भावाचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचं काम जीतू ने अनेकदा केलेलं आठवतं.

तीन वर्ष तुमसरमध्ये, शाळा कॉलेज, अभ्यास करुन चक्की सांभाळताना, आयुष्याच्या चढउतारांना तोंड द्यायचं, एव्हाना आम्ही शिकलो होतो. आई-दादाजींनी, इकडून तिकडून कर्ज काढून, नातेवाईकांच्या मदतीने हळूहळू पैसे साठवले आणि दुकानाच्या कम-यासह मागे तीन रुम बांधल्या. तुमसर मध्ये दोघेच भावंड रहात असल्याने, एवढं मोठ्ठ घर आम्हाला लागणार नव्हतं. सामोर चक्की, आणि मधली एक रुम आम्ही आमच्यासाठी ठेवून बाकी उरलेल्या दोन रुम एका कुटूंबाला भाड्याने दिल्या होत्या. चक्कीतून येणारी थोडीफार आवक, आणि दोन रुमची किराया यावर आमचं शिक्षण चालू होतं. परिस्थितीशी झगडा देत देत प्रवास आयुष्याचा महत्वपूर्ण भाग झाला होता.

एका रुममध्ये स्वयंपाक, तिथेच दहावी, बारावीचा अभ्यास कधी कधी चक्कीवरच्या कामाने अभ्यासात व्यत्यय यायचा, पण काही पर्याय नव्हता. चक्की चालवणं अभ्यासाइतकचं महत्त्वाचं होतं. ट्युशन वगैरेचं त्याकाळी फॅड नवीन आलेले होते. पण ते आमच्या खिशाला परवडण्सारखं नव्हतं. त्यामुळे आपला आपलाच समजून उमजून अभ्यास करावा लागायचा.

अभ्यास झाला नसेल तर बारावीत ड्रॉप घ्यायची नविन नविन पद्धत त्यावेळी अनेकजण अवलंबत. आपणही ड्रॉप घ्यावा का? मलाही वाटायला लागलं. तळात मळ्यात सिच्युएशन झाली होती. अपूरी माहीती, गोंधळलेलं मन, ड्रॉप घ्यायच्या विचारा-विचारातच मी कशीबशी परिक्षा दिली. पेपर अर्धवट सोडवून मी घरी यायचो, पास होईल म्हणून आशाच सोडली आणि निकाल लागला.

Chapter 5:      Govt Polytechnic Sakoli and Nagpur

बारावी मध्ये काठावर पास होऊन पन्नास टक्क्यांनी मी बारावी पास झालो होतो. पीसीएम ग्रुप इंजिनिअरिंगसाठी अतिशय महत्त्वाचा, आणि त्यांच पीसीएम ग्रुपमध्ये मला ४०% पडले. एवढ्या कमी टक्क्यांवर बीईला नंबर लागणं अशक्य होतं. काही चुकांना प्रायश्चित्त नसतं म्हणतात तेच खरं.

गावातल्या बीडी कंपनीच्या मॅनेजरला घेवून दादाजी, गोंदियाच्या कॉलेजमध्ये गेले. कारण कंपनी च्या मालकाचेच इंजिनीरिंग कॉलेज होते. मुलाची अॅडमिशन व्हायला हवी या एका आशेने. पण अॅडमिशनसाठी पीसीएम ग्रुपला कमितकमी ४५% पाहिजे होते. गोंदियाला जायचा काहीच फायदा झाला नव्हता. मुलगा हुशार असूनही, त्याचं नुकसान होतय, त्यांच्या चेह-यावरचं अगतिकतेच प्रश्नचिन्ह वाचण्याइतपत मी मोठ्ठा नक्कीच झालो होतो.

रात्री आम्ही सगळे एकत्र बसलेलो असताना, मी खूप काही हरवलयं असं जाणवलं. योग्य निर्णय आयुष्य घडवतो, तर एक अयोग्य निर्णय आपण बघितलेल्या स्वप्नांची राख-रांगोळी करतो. एक चूक आयुष्य बदलवून टाकते, हे त्या क्षणाला प्रकर्षाने जाणवत होतं. कदाचित ड्रॉप घेवून मी पुढल्या वर्षी बारावीची परिक्षा दिली असती तर परिस्थिती काही वेगळी असती. पण असो झालेल्या गोष्टींना उगाळत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढायचा हेच आईदादाजी सांगायचे.

हातातून निसटून गेलेल्या गोष्टींवर पाश्चाताप करत वेळ घालवण्यापेक्षा पुढे काय करायचं त्याचा विचार करायचा. त्यांच्यातली सकारात्मकता मला बळ देत होती. सगळं होईल नीट हा विश्वास देणारे, आमच्या यशापयशात आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहाणारे आईवडिल मला मिळाले होते. कमी मार्कांचं खापर त्यांनी माझ्या डोक्यावर कधीच फोडलं नाही, तर त्यातून मार्ग काढण्याचा सल्ला त्यांनी मला दिला, कमी शिकलेले असतानाही अनुभवाच्या शाळेत ते १०० टक्क्यांनी पास होते.

मी दहावीच्या मार्कांवर पॉलिटेक्निकसाठी फॉर्म भरला. कॉलेजेसची लिस्ट लागली, पाच जागेसाठी माझा वेटिंग लिस्टवर अठरावा नंबर होता. स्पर्धा तेव्हाही होतीच अॅडमिशन मिळेल की नाही, मनात धाकधूक होती. मनात गोंधळ उडाला होता. आई दादाजी मुंडीकोट्यालाच होते. तुमसरवरुन साकोलीला अॅडमिशनसाठी निघण्यापूर्वी, आमच्या घरी मागच्या दोन रुममध्ये रहात असलेल्या काकूंचा आशिर्वाद घेण्यासाठी मी गेलो. नमस्कार केला, डोक्यावर हात ठेवून काकूंनी आशिर्वाद दिला, जाओ बेटा अॅडमिशन मिल जायेगा!! काकूंचे ते शब्द अजूनही आठवतात. वडिलधा-या लोकांच्या आशिर्वादात खूप ताकद. चार अॅडमिशन झाल्या फक्त एक जागा शिल्लक राहिली होती. माझं आठवी ते दहावी technical असल्याने त्याचा मला फायदा झाला. आणि माझी अॅडमिशन झाली.

आजारपणात ज्याप्रमाणे डॉक्टरकडे गेल्याबरोबर आपला अर्धा आजार बरा झाल्यासारखं वाटतं. मोठ्या वडिलधाऱ्या लोकांच्या आशिर्वादात तीच जादू असते, अस मला वाटतं. त्यांचे आशिर्वाद आपल्याला सकारात्मक उर्जा देतात. अगदी छोट्याशा फरकाने हातातून निसटून जातात जाता राहिलेल्या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात, आणि आपण आपल्या नशिबावर सगळं सोडून जेव्हा निश्चित होतो तेव्हा आशीर्वाद कामाला येतात. हा क्षण आपला नाही कधीकधी वाटून जातं, अशा वेळी मोठ्या माणसांच्या आशिर्वादाने आपल्याला त्या कामाचं यथायोग्य फळ मिळत हा माझा विश्वास.

“प्रयत्नांती परमेश्वर” पण त्याला आशिर्वादाची जोड मिळाली की शुद्ध, सकारात्मक विचारांचं कवच आपल्या भोवती आपोआप तयार होत. घरी आल्यावर काकूंना माझी साकोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन झाल्याचं सांगितलं, हे सांगितल्यावर माझ्या आईच्या चेह-यावर जेवढा आनंद असला असता तेवढाच आनंद मला त्या काकूंच्या चेह-यावर दिसला. स्वत:चं टेंशन बाजूला सारुन दूस-यांच्या आनंदात आनंदी होता यायला पाहिजे. आणि त्यातलं समाधान मी “याची डोळा याची देह” अनुभवत होतो.

आपल्याबद्दल कुणी काय विचार करतं हे फार महत्वाचं ठरतं, आपणही नेहमी दुस-यांबद्दल चांगलाच विचार करायचा, केवळ पैसाच मदतीची स्वरुप असू शकत असं नाही तर दूस-यांचे आपल्याप्रती चांगले विचार ही पण God gift म्हणून आपल्यासोबत असली की, त्यातला शब्दरुपी आधार किमया करतोच. संतमहात्मे सांगून गेले “चित्त शुद्ध तर विचार शुद्ध” खोटं नव्हतचं.

गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, साकोलीच्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला. इंजिनियर होण्याच्या स्वप्नाची पहिली पायरी मी सर केली होती. गोडावून, गॅरेज वजा टिनेच्या शेडमध्ये त्याकाळी आमचं कॉलेज भरायचं. कॉलेज साकोलीजवळचं एका छोट्याशा खेड्यात होतं. गावात रुमचं भाड कमी असल्याकारणाने मी माझ्या सहा मित्रांसोबत गावातचं रुम शेअर करुन राहायला लागलो. आमची आपआपली काम आणि स्वयंपाक आम्हालाच करावा लागायचा.

नविन अॅडमिशन झालेल्या फ्रेशर्सला त्रास देण्याच्या हेतूने, नविन नविन रॅगिंगचं फॅड कॉलेजमध्ये सुरु झालं होतं. छोट्या मोठ्या शक्कली लढवून सिनिअर्स फ्रेशर्सची रॅगिंग घ्यायचे. या गोष्टीची कधी मज्जा तर कधी मनस्तापही व्हायचा. साकोलीच्या बसस्टॉपवर हातात पतंग आणि चक्री नसताना पतंग उडवण्याची रॅगिंग. आम्ही दहा बारा फ्रेशर्स मुल आकाशाकडे बघत, उन्हामुळे डोळे मिचरवत, पतंग उडवण्याची अॅक्शन करत होतो. रस्त्यावरुन येणारे जाणारे, बसमधले सगळे लोक आमच्याकडे मागे वळून वळून बघत होते, हसत होते.

रॅगिंगचं समर्थन मी करतच नाही. पण नविन मुलांची लाजाळू वृत्ती, त्यांचा भित्रेपणा घालवण्यासाठी कदाचित रॅगिंग उपयोगी ठरते अर्थात ती नियमात बसणारी, कुणाला ती मानसिक, शारिरीक त्रास देणारी नसावी असं माझं प्रामाणिक मत. या गोष्टीचा फायदा मला असा झाला की, लोक काय म्हणतील? याची भिती माझ्या मनातून निघून गेली. कधीकधी लोक काय म्हणतील या विचारात आपण इतके गुरफटतो, की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं याचा विचार करायचाच विसरुन जातो. आणि आपोआप आपली पावलं मागे खेचले जातात. आत्मविकासाच्या दृष्टीने स्टेज डेअरिंग यातलाच खूप मोठा भाग. एखाद काम आपल्याला जमेल की नाही, कुणी आपल्यावर हसलं तर काय? कुणी आपल्याबद्दल काय विचार करेल वगैरे, विचारात स्टेजवर बोलण्याची भिती वाटली तर आपल्याला स्टेजवर बोलण्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होणारच नाही.

याऊलट एकदा चूकेल, दोनदा चूकेल!! आणि हसतील त्याचे दात दिसतील एवढ्या positive way नी जर एखादी गोष्ट घेतली तर कोण काय म्हणतं यापेक्षा त्यांच्या उपहासात्मक वागण्यातून आपल्यात बदल करण्यात मदत होईल हे मला पटायला लागलं होतं. म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला चूका दाखवणारी व्यक्ती सोबत असली की, चूकूनही चूका होत नाही!! कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून पाहीलं तर त्यातल्या सकारात्मक बाजू आपोआप उलगडत जातात. आजही आम्हाला केल्या गेलेल्या रॅगिंग्ज आठवून खूप हसायला येतं. आम्ही आमच्या पहिल्यावहिल्या रॅगिंग्ज ख-या अर्थाने एंजॉय केल्या होत्या.

खरं तर कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतातच अनेकदा आपण हेच विसरुन जातो. प्रत्येक वेळी रॅगिंगचं स्वरुप नकारात्मक किंवा हिंसक असेलच असं नाही. किंवा रॅगिंग करणारे वाईट असतील असही नाही. तर नव्या कॉलेजमध्ये आलेल्या नविन मुलांचा बूजरेपणा, घाबरटपणा, लाजाळूपणा घालवण्यासाठीची सिनियर्स सोबत coordinate करण्यासाठीची एक मदतच असते.

त्यानिमित्ताने सिनिअर्ससोबत संवाद साधला जावू लागला त्यांच्याशी, ओळख्या झाल्या त्याचा फायदा असा झाला की मला आणि माझ्याच वर्गातल्या आणखी दोन मुलांना कॉलेज स्पोर्ट्स टिममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. संतोष!! . आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन, आमचा सिनियर लास्ट इयरला होता. जॉली नेचरचा, सतत हसणारा, हसवणारा, एकदम बिनधास्त. टिममधल्या मुलांना तो छान गाईड करायचा. आमच्या चूका सांगून सांभाळून घ्यायचा.

खेळ कुढलाही असो, फक्त एकट्याने चांगलं खेळून चालत नाही तर त्यासाठी संपूर्ण टीमने जीव ओतून खेळणं अपेक्षित असतं. संतोष एक चांगला नेतृत्व करणारा खेळाडू होता. हसतखेळत वातावरणात गाणं गुणगुणत, हरण्या-जिंकण्याचं कुठलही दडपण न ठेवता, हलका-फुलक्या वातावरणात तो खेळायचा आणि खेळवायचा. त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठी नाही तर आपल्या आनंदासाठी खेळायला मिळायचं. खेळ खेळताना जिंकण्याचा विचार न करता मनसोक्त आनंद घेत, आपले १०० टक्के ओतायचे, हे आम्ही संतोषकडून शिकलो.

आमची जिल्हास्तरीय क्रिकेट मॅच देवमुंढरीला होणार होती. पाचही नॉकआउट मॅचेस मध्ये चांगल्या चांगल्या टिमला हरवून आम्ही जिंकून ट्रॉफी घेवूनच आलो. दादाजी नेहमी म्हणायचे, तुम्ही पाच पोर म्हणजे माझ्या हाताची पाच बोट नाही तर एक मुठ बनून राहा, त्यांच्या म्हणन्याचा अर्थ आता उलगडत होता. एक काडी तोडणं सोप्प असत पण त्याच काड्यांची मोळी बांधली तर!! ती तुटता तुटत नाही, शाळेत शिकलेल्या मोळीची कथेचा अर्थ आता उलगडत होता. “दादाजींच्या शब्दात मुठ म्हणजे ती मोळीच तर होती”. आणि तेच मला संतोष कडूनही शिकायला मिळालं.

या सगळ्यातून मी एक बोध घेतला. आपल्या नावाचं सार्थक कराययं. आई म्हणायची “आकाशातल्या ता-यांवर राज्य करणारा, ता-यांचा राजा तारेंद्र” . दूस-यांवर राज्य करण्यापेक्षा सगळ्यांना सांभाळून घेण्यातली मजा काही औरच असते. त्यादिवशी एक गोष्ट मनात ठरवली. आपलीही एक टिम बनवायची आणि त्याचं नेतृत्व करायचं. सगळ्यांना सोबत घेवून चालायचं मग ते भाऊ असो कुटूंब असो किंवा एखादी टिम असो. संतोषच्या टिम स्पिरीटचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि How to build the perfect team?? हे मला संतोषकडूनच शिकायला मिळालं.

आम्ही सहा मुल एका भाड्याच्या खोलीत राहायचो. इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंग ड्रॉईंग हा सब्जेक्ट अतिशय महत्वाचा. मला ड्रॉइंग ची आवड होती. बाकी मित्रांना मात्र फार कंटाळा यायचा, मग मी त्यांचे व ड्रॉईंग काढून द्यायचो. ते मला त्याचा मोबदला द्यायचे, कधी एका ड्रॉईंगचा एक रुपया, तर कधी माझं एखाद काम करुन घ्यायचे. कधीकधी पिच्चर तर कधी नाश्ता पाणीही मिळायचा. तेवढाच जरासा विहंगूळा जगायला मिळायचा. त्यामुळे ड्रॉईंगचा मला छान सराव व्हायचा, कॉलेजमध्ये टिचरही माझ्या ड्रॉईंगचं फार कौतुक करायचे. सहाजिकच होतं. तुम्ही एखादी गोष्ट पोटतिडकीने, आवडीने करता तर त्यात तुम्ही पारंगत होताच. Practice makes man perfect हे वाक्य तिथेच माझ्या मनावर कोरल्या गेलं.

कॉलेजचे ते दिवस स्वप्निल स्वप्नात रमण्याचे दिवस. हातातून लवकर सरकले. हा हा म्हणता दोन वर्ष कसे संपले कळलं देखिल नाही. आपला स्कोर चांगला असला की आपल्याला कॉलेज चेंज करण्याची फॅसिलीटी मिळते. माझ्या एक दोन मित्रांनी केलेलं असल्याने मला मी प्रयत्न करायचं ठरवलं. योगायोगाने पहिल्याच प्रयत्नात माझी नागपूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये अॅडमिशन झाली.

आयुष्य हे चॅलेंजेसने भरलेलं असावं, म्हणजे motivation मिळतं. शिक्षणाच्या दृष्टीकोनातून खेडयातलं आणि शहरातलं, शिक्षण, वातावरण यात बराच फरक पडतो. माझी रवानगी होस्टेलवर झाली. कॉलेजमध्ये मित्रांचे ग्रुप आधिच ठरलेले होते. त्यात मी असा मधूनच आलेला. त्यामुळे सहजासहजी कुणी पटकन मला आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करुन घेणार नाही. हे मी गृहित धरल होतं. पूर्वीपासूनच अशा परिस्थितीत हाताळायची एवढी सवय झाली होती की मनात भिती नावाच्या गोष्टीला मी जवळच फिरकू देत नव्हतो.

शहरातले मुल खेड्यातल्या मुलांना तसाही भाव कमी देतात ते मला पॉलिटेक्निक मध्ये आल्या आल्या जाणवलं. शहरातलं वातावरण, तिथल्या मुलामुलींच्या राहाण्या वागणाच्या पद्धती. टापटीप कपड्यांमध्ये, महागड्या गाड्या घेवून येणारे श्रीमंत, सुखवस्तू घरातले मुलं. माझ्याजवळ त्यातलं काहीच नव्हतं. दोनतीन ड्रेस आलटूनपालटून घालावे लागायचे. फाटक घालावं पण नेटकं आणि स्वच्छ घालावं आई नेहमी सांगायची त्यामुळे कपड्यालत्याने तसा निटनिटका राहायचो. दिखावा दाखवण्यासाठी ना पैसा होता ना ते संस्कार, ना माझा तो स्वभाव होता.

जेही करायचं ते आपल्या मेहनतीवर करायचं होतं. बॅक बेंचर्सच्या गर्दीचा भाग होऊन, मला राहायला मला कधीच आवडलं नव्हत. तर तिथेही जायचं तिथे आपल्या नावाचा ठसा उमटवायचा, आणि आपलं नाव कमवायचं, त्याचा एकमेव रस्ता अभ्यासाच्या दारातून जात होता.

कौन करता है आसमां मे सुराग नही हो समता

एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो  .(दुष्यंत कुमार)

सर्वसामान्य माणसाने देखिल ठरवून प्रयत्न केले तर तो यशस्वी होतोच होतो. याचाचं प्रत्यय मी कॉलेजमध्ये अभ्यास करुन जाऊ लागलो, वर्गात शिकवले जाणारे टॉपिक्स मी आधिच वाचलेले असल्या कारणाने मला ते लवकर समजायचे आणि त्यामुळे टिचर्सने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला माझा हात वर असायचा. साधा, सर्वसाधारण दिसणारा खेड्यातून आलेला बारिकचूरिक मुलगा हुशार आहे माझी वर्गात ब-यापैकी ओळख होत होती. शहरातल्या मॉडर्न, डॅशिंग हिरोगिरी करणा-या मुलांमुलींच्या नजरेत माझी छबी हळूहळू बदलू लागली. आईवडिलांच्या पैशावर मौजमजा करणारे सगळेच होते, मला मात्र स्वकर्तृत्वावर विजय मिळवायचा होता.

वर्गात असे अनेक बॅकबेंचर्स होते. प्रत्येकाला कशाचा ना कशाचा न्युनगंड होता, उंची, लठ्ठपणा, बारिक, कुणाला रंगाचा, तर कुणाला आत्मविश्वासाची कमी. अभ्यासू आणि हुशार असूनही चारचौघात बोलायचं धाडस होत नसल्या कारणाने वर्गात मागे पडायचे. Personality development असला काही प्रकार तेव्हा अस्तित्वात नव्हता आणि असेल तरी आम्हाला ते माहिती नसावं. माझ्या सारखेच खेड्यापाड्यातून आलेले अति दुर्गम भागातून आलेले अति मागासवर्गीय मुलं कॉलेजच्या गर्दीत हरवत चालले होते.

यांच्यासाठी काहीतरी करावे मनोमन वाटत होतं. आई नेहमी सांगायची, “उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, आपण मावळतीच्या सुर्याला पण धन्यवाद देवून उद्या येण्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे”. कमजोर बाजू असलेल्यांना मदत कर, त्यांनाही सोबत घेवून पुढे जा. तुझं चांगलच होईल. हाच तर विचार आईने आजपर्यत मनावर बिंबवला होता.

जन्मत: कुणीच परफेक्ट नसतं तर, आपल्यात बदल करुन परफेक्ट होण्याच्या दिशेने स्वत:चं स्वत:ची पाऊल उचलावी लागतं, गरज असते “तू चाल गड्या तुला रं गड्या भिती कशाची म्हणना-या एखाद्याची हाताची”. आणि मला त्यांचा तो एखादा हातच व्हायचं होतं. त्यांना प्रेरणा देणारा त्यांना तुम्ही करु शकता म्हणून आधार देणारा व्हायचं होतं. त्याचा फायदा मलाही होणारच होता.

मी मित्रांच्या कमजोर बाजू़वर त्यांच्याशी बोलून, चर्चा करुन, त्यांच्यात असलेल्या गुणांना उभारी देवू लागलो. त्यांना अभ्यासात मदत करु लागलो, ड्रॉइंग, प्रोजेक्ट्समध्ये त्यांना मदत करताना, त्यांच्या अभ्यासातल्या अडीअडचणी दूर करताना माझ्या concept clear व्हायच्या. आत्ता नविन कॉलेजमध्ये माझीही टिम तयार झाली होती आणि मी त्या टीमचं नेतृत्व करत होतो.

कॉलेजमध्ये भरलेल्या science exhibition मध्ये आम्ही automatic electric bridge तयार केला, आणि तो bridge कॉलेजमध्ये चर्चेचा विषय बनला. थोड्याच दिवसात पॉलिटेक्निक मधल्या शिक्षकांबरोबरच, हाच का तो तारेंद्र!!! मला अख्ख डिपार्टमेंट ओळखू लागलं. बाकी विध्यार्थी ही माझ्या मागे मागे फिरु लागले. माझी मदत घ्यायला माझ्या होस्टेलवर येवू लागले. कॉलेजच्या सुंदर मुलीही मला भाव द्यायला लागल्या. त्या काळी मुलांसोबत मुलींनी बोलन म्हणजे खूप अप्रुप वाटायचं. हिरो असल्याची dashing फिल यायची. स्वत:चं एक स्टेटस त्या कॉलेजमध्ये मिळालं होतं, स्वत:चा कॉन्फिडन्स बिल्ड केला होता. नागपूरच्या कॉलेजमधलं एक वर्षही चुटकीसरशी संपलं, परिक्षा संपली आणि मी ६८ टक्क्यांनी पॉलिटेक्निकची परीक्षा पास झालो होतो.

इकडे जीतूने बारावीत असताना एक वर्ष ड्रॉप घेतला. हा निर्णय घरच्यांसाठी जरा कठिण असेन अस वाटलं होतं. पण आई म्हणाली तुला वाटतयं ना. एक वर्ष पुन्हा अभ्यास करुन चांगले मार्क मिळतील तर मग ठिक आहे, कर एक वर्ष पून्हा अभ्यास. एक वर्ष वाया जाईल वगैरे या प्रकारचे विचार आईच्या मनात आले नसतील का? याचं खरं तर आश्चर्य वाटतं. नाईट कॉलेजामधून जीतू बारावीत महाराष्ट्रातून पहिला आला, होता. म्हणजे स्वत:च्या भवितव्याचा पाठलाग आपण स्वत: कसा करायचा हे कदाचीत आम्हाला कळायला लागलं होतं त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स अधिकाधिक वाढायला लागला.

 Chapter 6:      Polytechnic Nagpur To Engineering at Nanded

आमच्या मुंडीकोटा गावातले शरद ढबाले काका, ते मिलिट्रीमध्ये असल्याने त्यांच्या शिस्तबद्ध आयुष्याचा माझ्यावर चांगलाच प्रभाव होता, त्यांची पोस्टींग नागपूरलाच होती. परिक्षा संपली आणि रिझल्ट लागेपर्यंत दिड दोन महिन्याचा वेळ होता. शरद काकांनी माझी एका बिल्डरसोबत ओळख करवून दिली. मला आठवत ते मला त्यांच्या सायकलवर बसवून पाच दहा किलोमीटर घेवून गेले होते. माणसाच्या माणुसकीतला जीवंतपणा त्या काळी उघड्या डोळ्यांनी बघता आला. हृदयशुन्य लोकांची तशी फार गाठभेट झाली नव्हती. “आपण चांगलं तर जग चांगलं” या विचारतत्वावर चालत असल्याने मदतीला धावून येणारे अनेक हात पुढे असायचे.

मी नागपूरला दोन, महिने एका ठिकाणी कॉन्स्ट्रुकशन साईट सुपरवायझरचं कामही केलं, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फिल्ड वर्कचा छोटासा का होईना पण पहिलावहिला अनुभव मला तिथे शरद काकांमुळे मिळाला. रिझल्ट लागला, ६८ टक्क्यांनी मी डिप्लोमा इन सिविल इंजिनीरिंग पास झालो. Bachelor of Engineering (बीई) करण्याचा ध्यास कायमच मनात होता. माझा एक मित्र ज्ञानेश्वर मदनकर त्याने सांगितलं की बीईची अॅडमिशन ८०% पर्यंत क्लोज होते. ख-या अर्थाने सत्य परिस्थितीची ओळख झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात केवळ आठ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस होते, प्रायव्हेट कॉलेजेसची फीस आवाक्याबाहेर होती. प्रायव्हेट कॉलेजची ४० हजार फीस त्यामानाने गव्हर्नमेंट कॉलेजची फीस खूप कमी होती. मनात उच्च शिक्षणाची आस कायमच असल्याने कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, प्रयत्न करायचं ठरवलं.

पास झालेल्या मुलांच्या यादित म्हणजेच गॅझेटमध्ये माझा रोल नंबर होता, पण मी साकोलीवरुन ट्रांसफर झालेला स्टुडंट असल्याने, अजून पर्यत माझी मार्कलिस्ट आलेली नव्हती त्यामुळे मला कॉलेजची TC पण मिळाली नव्हती. इकडे बीईचा फॉर्म भरायची लास्ट डेटषजवळ येत चालली होती आणि तिकडे मार्कलिस्ट, TC (Transfer Certificate) चा थांगपत्ताही नव्हता. पॉलिटेक्निकचा शिक्षण बोर्ड मुंबई असल्याने प्रोसेस मध्ये बराच वेळ लागला, आता माझ्याजवळ थांबण्यासाठी तेवढा वेळही नव्हता.

मी नागपूरच्या आमच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गेलो. बीईचा फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक पॉलिटेक्निकचे कोणतेच डॉक्युमेंट्स माझ्याजवळ नसल्याचं त्यांना समजवून सांगितलं. रिझल्ट आला नसल्याने त्यांनी TC द्यायचंही नाकारलं. त्यांना मी रिक्वेस्ट करुन, माझं नाव असलेल्या गॅझेटच्या पानाची झेरॉक्स कॉपी मागितली. माझ्या नावावर मार्क करुन त्यांनी कॉलेजचा स्टॅम्प आणि सही केली. जी डॉक्युमेंट खरा असल्याची ची ओळख होती. तो एकमेव डॉक्युमेंट घेवून मी मुंबईला जायचं ठरवलं.

मुंबईत ओळखीच असं कुणीच नव्हतं. कुणाला सोबत घ्यायचं, नागपूरला राहाणारे माझे मारोती मामा माझ्यासोबत यायला तयार होते. मामा रेडीओ मेकॅनिक होते, दूस-यांच्या दुकानात काम करायचे. मामा चे अंगावर चे काम होते, आणि ४-५ दिवसाची सुट्टी परवडणारी नव्हती. त्यांचा माझ्यावर खूप जीव, मामाने माझ्या एका शब्दावर सुट्टी काढली होती. त्याकाळी फोन वगैरेची सुविधा नव्हतीच. त्यामुळे मुंबईला जायच्या पहिले आईला भेटणं गरजेचं होतं. दुपारी दोन वाजता आम्ही नागपूरहून मामाच्या गाडीने निघालो. नागपूर, भंडारा, तुमसर आणि अखेर रात्री नऊ वाजता मुंटीकोटा गावी पोहचलो. आईदादाजींना पुढल्या शिक्षणाचा प्लॅन सांगितला. आणि आईने बिनधास्त जा म्हणून मंजुरी दिली.

मोजकेच एक दोन ड्रेस. आईने रात्रीच माझे कपडे धुवून वाळत टाकले, आणि सकाळी निघायच्या पहिले माझ्या हातात पाचशे साडेपाचशे रुपये ठेवलं. एवढ्या अडचणींमधून आई कसे पैसे जमवायची आणि कुणास ठावूक, आणि ऐनवेळी आमची गरज भागवायची. त्यावेळी मुंबईची तिकीट १०० रुपये वगैरेच होती. आम्ही सकाळी आठ वाजता मुंडीकोटा वरुन निघालो आणि दुपारी ३च्या विदर्भ ने मुंबईला रवाना झालो. general डब्ब्यात रात्रभर धक्के खात कसेबसे मुंबईला पोहचलो.

या आधी मी मुंबईला फक्त एकदा कॉलेजच्या स्पोर्ट्स टिम सोबत गेलो होतो. मुंबईत तेव्हा आमचे कुणीच ओळखीचे किंवा नातेवाईक राहात नव्हते. प्रश्न पडला आता कसं जायचं कुठे रहायचं. कॉलेजमधून खेळायला गेलो असताना बदलापूरला रहाणा-या मित्राच्या घरी गेलेलो ते आठवलं. आणि मित्र तुषार देशमुखच्या घरी जायचं ठरवलं. त्याकाळी फोनची सुविधा नव्हतीच त्यामुळे मी सकाळी सकाळी तुषार च्या घरी धडकलो. लोकलची गर्दी आणि ती रस्त्यावरील भीडभाड माझ्यासाठी सगळचं नविन होतं, पण त्यानेही मला मदत केली. जीवाला जीव देणारी, माणूसपण जपणारी माणसं आयुष्यात गंभिर परिस्थितीतही जगण्याची ताकद देवून जातात.

अगदी शेवटच्या दिवशी सोमवारी फॉर्म भरला, पण बाबूने मार्कलिस्ट आणि TC शिवाय फॉर्म घेण्याचं नाकारलं. शेवटी मनधरणी करावी लागली. शुक्रवारी अॅडमिशनच्या प्रोसेसमध्ये मार्कलिस्ट जवळ असणं गरजेचं होतं. त्याशिवाय फक्त गॅझेटच्या भरवशावर अॅडमिशन मिळाली नसती. आणि अॅडमिशनच्या इंटरव्यूच्या पहिले नागपूरला येवून मार्कलिस्ट किंवा TC घेवून जाण काही केल्या शक्य नव्हत, कारण मार्कलिस्ट कॉलेजमध्ये आलेलीच नव्हती.

मी थेट मुंबई बोर्ड गाठलं. तिथे मार्कलिस्ट मला देण्यासाठी खूप विनवणी केली पण सगळे प्रयत्न व्यर्थ . त्यांनी मला सगळी प्रोसेस समजावून सांगितली. आणि मार्कलिस्ट कॉलेजमध्येच येईल तुम्हाला आम्ही अशी इथे देवू शकत नाही ते मला सांगून मोकळे झाले. आपापल्या परीने सगळ्यांचेच हात दगडाखाली असतात म्हणतात तेच खरं. कितीही मदत करण्याची भावना असेल तरीही कधीकधी त्याचा फायदा होत नाही. सरकारी नियमांच्या बंधनात कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा बघितलाच जात नाही. पण नियमांची नियमावली मात्र मनस्ताप वाढवते.

त्यांनी मला जायला सांगितलं, बघू काय होतय का ते या विचाराने, मी तिथेच बसून राहीलो, शेवटी प्रयत्नांनी दगडाला ही पाझर फुटतोच ना!! ऐकलं होतं. दोने तीन तास झाले, पण मार्ग सापडत नव्हता. दुपारी चार वाजता मला आमच्या नागपूरच्या कॉलेजचे एक सर तिथे भेटले. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली, एका वरिष्ठ अधिका-याच्या मदतीने त्यांनी मला माझी ड्युप्लिकेट मार्कलिस्ट मिळवून दिली. सरांच्या रुपात जणू देवच धावून आल्यासारखं वाटलं. त्या सरांचे आभार मानावे तेवढे कमी.

शुक्रवारी कॉलेजेसची अॅडमिशन लिस्ट लागणार होती. बारावीनंतर बीई, पण पॉलिटेक्निक झालेल्या मुलांसाठी डायरेक्ट सेकंड इअरला अॅडमिशन असते आणि त्यासाठी काही जागा राखीव असतात. त्यात माझा वेटिंगलिस्टवर १८० वा नंबर होता. मनात धाकधूक वाढली होती. एका एका मुलांची अॅडमिशन होत होती. शेवटी नांदेडच्या कॉलेजच्या अगदीच पाच जागा शिल्लक राहील्या होत्या.

आत्ता या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावी ही एकच आशा होती. नांदेडच्या कॉलेजमध्ये सिव्हील वॉटर मॅनेजमेंट या ब्रॅचसाठी अॅडमिशन प्रोसेस सुरु झाली. सिव्हील वॉटर मॅनेजमेंट मध्ये बीई केलेल्या मुलांना MPSC ची परिक्षा देता येणार नाही, हा पॉईंट घेवून मदनकर आणि मी, आम्ही दोघांनी चर्चा सुरु केली. पाहाता पाहात ती गोष्ट हॉलमध्ये वा-यासारखी पसरली. अॅडमिशन घेणा-या मुलांची “इकडे आड तिकडे विहीर” अशी द्विधा मनस्थीती झाली. आमच्या चर्चेला उधाण आलं.

जर MPSC ची परिक्षा देताच येणार नसेल तर या ब्रॅंचमध्ये अॅडमिशन घेवून फायदा नाही म्हणत मुलं, प्रायव्हेट मधून सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याच्या विचाराने घरी निघून जाऊ लागले. आणि अखेर माझं नाव अनाऊंस करण्यात आलं.

ड्युप्लिकेट मार्केशीट आणि जवळ TC नसल्याने पुन्हा त्यांनी अॅडमिशन द्यायची नाकारली. तोंडचा घास पुन्हा हिरावला जातो की काय असं वाटायला लागलं. मदनकर आणि मी, आम्ही दोघांनीही सिलेक्शन कमेटीतल्या मेंबर्सला खूप विनवण्या केल्या. कारण या सगळ्या परिस्थितीला मी प्रत्यक्षपणे जबाबदार नव्हतोच. आणि अखेर त्यांनी मला मंगळवार पर्यत TC सबमिट करण्यासाठी सांगून माझी नांदेडला सिव्हिल वॉटर मॅनेजमेंटमध्ये अॅडमिशन झाली. अर्थात सुयोग्यपणे सगळं पार पडले होतं. अखेर माझी अॅडमिशन झाली होती.

नागपूरला येवून, कॉलेजमधून TC साठी अर्ज लिहीला, ड्युप्लिकेट मार्कलिस्टचं प्रकरण ऑफिसमधल्या बाबूसाठी आश्चर्यकारक होतं. सगळा प्रकार त्यांना पुन्हा सांगून मला TC मिळाली. आणि अखेर मंगळवार पर्यत मी नांदेड च्या इंजिनीरिंग कॉलेज ला TC सबमिट केली.

एखादी गोष्ट आपल्याला मिळावी म्हणून अगदी मनापासून इच्छा केली तर आपला आपल्यावरचा विश्वासच ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ठरतो. हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा असतेच असते आणि ती अमर आशा म्हणजे आपलाच आपल्यावरचा प्रबळ विश्वास असायला हवा. किसी चिज को शिद्दतसें चाहो तो सारी कायनात, तुम्हे उस चिजसे मिलानेमें जूट जाती है।। शाहरुख खानचा सिनेमातील हा dialogue कित्ती खरंय ना!!

Chapter 7:      Engineering at Nanded

माझ्यानंतर क्रांती जीतूसोबत राहायला तुमसर मध्ये आला. अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून जीतूने बारावीत ड्रॉप घेतला. अनुभव माणसाला खूप काही शिकवतो. एका एका मार्कांसाठीची ओढाताण बघत होतो, अनुभवत होतो. त्यामुळे जीतूच्या ड्रॉप घेण्याच्या निर्णयाचं घरात स्वागतच झालं. आईनेही त्याच्या निर्णयाला पाठिंबाच दिला. नाईट कॉलेजमध्ये अॅडमिशन करुन दुपारी चक्की आणि फावल्या वेळेत अभ्यास असा जीतूचा नियमित दिनक्रम असायचा. ८०% गुण घेवून तो नाईट कॉलेजमधून महाराष्टात पहिला आला होता.

अभ्यासातलं सातत्य, सराव आणि जोडीला कठोर परिश्रम त्याच्या चांगल्या मार्कांच गमक होतं. त्याला फार अॅडमिशनसाठी झगडावं लागणार नव्हतं. हव्या त्या कॉलेजमध्ये त्याला सहज अॅडमिशन मिळाली असती. योगायोगाने आम्ही दोघेही एकाच वर्षी बी.ई.ला अॅडमिशन करणार होतो.

दोघांचा दोन ठिकाणचा खर्च कसा झेपणार? माझा नांदेडला नंबर लागला होता. नागपूरच्या VRCE College मध्ये अॅडमिशन प्रोसेस सुरु होती. खूप विचारांती जीतूने नांदेडलाच अॅडमिशन घ्यायचं ठरवलं. गरीबी ही शाळा, आणि परिस्थिती हा उत्तम शिक्षक असतो. परिस्थितीला दोष न देता तडजोड करायची आता चांगलीच सवय झाली होती. त्यामुळे वरवर विचार न करता सखोल आणि समजूतदारपणे विचार करुन निर्णय घ्यावे लागायचे. आणि ते निर्णय घेण्यासाठी आम्ही भाऊ सक्षम होतो. आई दादाजी आमच्या सगळ्याच निर्णयात आमच्या सोबत असायचे. कम्प्युटर इंजिनिअरिंग नांदेडला जीतूची अॅडमिशन झाली.

माझ्या अॅडमिशनचे आणि जीतूचेही चार हजार वरचा जाण्यायेण्याचा, राहाण्याचा खर्च असे जवळजवळ दहा हजार रुपये आईने कसे जमवले असतील आजही मला पडलेला अनुत्तरित प्रश्न. आईला गावात अनेक लोक मदत करत. आईचा पैशाच्या बाबतीतला व्यवहार गावातल्या सगळ्या लोकांना माहिती असल्याने वेळप्रसंगी अडचणीला अनेक मदतीचे हात धावून येत असावे असा माझा फक्त अंदाज. पण गरजेच्या वेळी आईने पैशाअभावी आमचा शिक्षणाचा मार्ग कधिच थांबवला नाही.

नांदेडचे कॉलेज शहरापासून १० ते १२ किमी लांब विष्णुपुरी गावात होतं. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मोजक्याच जागा होत्या, त्यामुळे जास्तीत जास्ती मुलांना नांदेड शहरात रुम करुन राहावं लागायचं. आम्ही दोघेही आमच्या एका मित्रासोबत गणेश डेकाटे सोबत राहू लागलो. स्वयंपाकात दोघेही तरबेज होतोचं.

माझा डिप्लोमा झालेला असल्याने, माझी बी.ई.च्या दुसर्‍या वर्षात डायरेक्ट अॅडमिशन झाली. जीतू आमचा जुनियर होता. मोठ्या भावासोबत राहात असल्याने थोडंफार का होईना पण दडपण जीतूला येत असावं, मनमोकळेपणाने मित्रासोबत राहाण्याची मज्जा काही औरच, आणि तोच कॉलेज जीवनाचा महत्वाचा कणा त्याला परवाना लागू नये म्हणून, मी त्याला मित्राकडे राहाण्याचा सल्ला दिला.

शहरातल्या खोलीचं भाडही जास्ती पडत होतं. कॉलेज दूर पडत असल्याने जाण्यायेण्यात बसचा ही बराच खर्च व्हायचा. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला. जीतू नांदेडमध्ये त्याच्या काही मित्राच्या रुमवर शिफ्ट झाला. आणि मी विष्णुपूरीच्या, जवळ एका आसर्जन खेड्यात माझ्या मित्रासोबत रुम करुन राहू लागलो. शहराच्या मानाने इथे रुमचं भाड खूपच कमी होतं. जिथे नांदेडमध्ये तिनशे रुपये एका रुमचं भाडं पडायचं तिथे गावात ३५ रुपयात काम निभायचं. परिस्थितीने गरीब असलेली बारा पंधरा मुलं आम्ही गावात राहायचो. ट्युशन्स, सिनेमा, हॉटेलिंग किंवा मुलामुलीं सोबतच्या गप्पा-टप्पा किंवा फिरण्या-विरण्याला, मुलींच्या फ्ल-टिंगला गावात काहीच चान्सच नव्हता. गावात आपल्या कामाशी काम ठेवावं लागायचं.

कॉलेजपासून आम्ही राहात असलेलं गावं दोन ते अडीच किमी असल्याने पायीच जावं लागायचं. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाचायचा. शेतातून चालत कॉलेजला जाव लागायचं, गावाजवळच्या नदिवर एक डॅम होता, त्या नदिवर आयुष्यात पहिल्यांदाच मी पोहायला शिकलो.

गावाजवळ दहाबारा किमी डॅमचं पाणी संथ रहायचं. नदीचं पात्र मोठ होतं. जवळजवळ पाऊन-एक किलोमीटरच्या आडव्या पात्रात न थांबता सलग, पोहणा-याला बोटिंग लायसन्स मिळायचं. लायसन्स देणारे सर दोन चार महिन्यात एकदा यायचे, आणि परिक्षा घ्यायचे आणि मी निर्धार केला, यावेळेस आपण लायसन्स मिळवायचं. माझा हळूहळू सराव सुरु होताच आणि त्या दिवशी मी पोहत जाऊन पात्र क्रॉस केलं. मला बोटिंग लायसन्स मिळालं. मग काय न थांबता, न चुकता दहाबारा किमी अंतर संथ पाण्यात बोट चालवायचो. तोही अनुभव मला हिंमत देवून गेला आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. हिंमतीच्या जोरावर सगळं शक्य असतं.

म्हणतात ना;

लहरोंसे डरकर नौका पार नही होती

कोशिश करनेवालोंकी हार नही होती

Dam वर कॉलेज चे बोट क्लब होते. तिथे बॅडमिंटन अँड टेबलं टेनिस कोर्ट होते. कॉलेज सुटल्यावर मी सरळ बोट क्लबला जायचो. स्विमिंग, टेबले टेनिस , बॅडमिंटन आणि पुन्हा स्विमिंग असा कार्यक्रम चालायचा. रात्री अंधार झाल्यावरच रूम वर परतायचे… ख-या अर्थाने अभ्यासाबरोबरच आनंदाने रचण्याचे आणि enjoy करण्याचे दिवस होते अस मला वाटतं. गावात राहताना मला अजय भोंगे आणि रवी जोशी सारखे चांगले वर्गमित्र सुद्धा भेटले. असच एकदा बोट क्लब वर एका सिनियर ला पाण्यातुन डुबताना वाचावंताना मरता मरता वाचलो. पाण्याला इतका घाबरलो होतो कि ४ दिवस अंघोळ सुद्धा केली नव्हती.

BE चे तिसरे वर्षही आठवणीत रमण्यासारखे होते. मी या वर्षात निसर्गाला अधिकाधिक जवळून अनुभवलं. मोकळ्या हवेतला स्वच्छंदीपणा, उंच उंच डोंगरमाथा तिथली हिरवळ, झाड झुडपे, सकाळ-संध्याकाळी नदीत उड्या घेवून मनसोक्त पोहणं, खेडगावात राहिलेल्या मला याचं फार अप्रूप नसावं खरतरं पण निसर्गाच्या सानिध्यात जगणं ख-या अर्थाने मी तिथे शिकलो. जमिनीवरुन आकाशाकडे झेप घेणा-या पक्षाचं मातीशी नातं तुटत नसतंचं तर तेवढ्याच वेगाने स्वच्छंदी पणे भिरभिरत ते जमिनीवर येत पु्हा उंच झेप घेण्यासाठी. तशीच झेप मलाही घ्यायची होती. बी.ई.चं दुसरं वर्षही संपलं.

मेहनतीने अभ्यासात पुढे पुढे जात होतो. प्रोजेक्ट, सबमीशन्सचा खर्च वाढणार होता. घरुन येणा-या मोजक्या पैशात दोघांचाही खर्च साभाळायचा, म्हणजे खरी कसरत असायची. पुन्हा एक शक्कल लढवली, आपला खर्च कमी करायचा! खर्च तसा फार नव्हताच पण दोघांच्याही रुमचं भाड, जीतूचा बसच्या प्रवासाचा खर्च, वाचवल्या जावू शकतो का? याकडे लक्ष वेधलं . आणि त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.

हॉस्टेल वर राहाण्याचा फायदा असा होता की कॉलेजची कम्प्युटर लॅब हॉस्टेल मधल्या मुलांसाठी अगदी कितीही वेळ वापरायला मिळायची, जीतूसाठी ती सुवर्ण संधीच होणार होती. कारण २४ तास कम्प्युटर लॅब सुरुच राहायची. त्यातल्या त्यात हॉस्टेल कॉलेजच्या आवारात असल्या कारणाने प्रवासाचा खर्चही लागणार नव्हता.

बाबूला घरची सगळी परिस्थिती सांगितली, त्यांच्यापुढे मदतीसाठीच आवाहन केलं, त्यावर बाबू म्हणाले यदी किसीके रुम में अॅडजस्ट हो सरते हो तो रह लो दोस्तोंके साथ . होस्टेलवर माझे दोन मित्र गणेश डेकाटेसोबत आणि प्रशांत पुरी राहायचे, आम्ही दोघांनी त्यांच्या रुममध्ये रहायचं ठरलं, त्यावेळी एका सोमिस्टरची एकाची फिस ६०० रुपये होती, आम्ही दोघांचे मिळून २०० रुपये दिले असावे बहूतेक, नियमात बसत नसताना, हॉस्टेलच्या रुममध्ये जास्तीचे दोन पलंग टाकून दोन मित्रांसोबत जीतू आणि मी दोघेही राहू लागलो. त्या दोघांनीही आम्हा दोघांना त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. आजही माणुसकी जीवंत आहे यावर माझा ठाम विश्वास या सगळ्यांचाच प्रत्यय असावा कदाचित.

परिस्थिती शिकवत होती आम्ही शिकत होतो. राहाण्याची सोय झाली होती. आता जेवणाचा प्रश्न होता. मेसमधल्या मामाला आमची परिस्थिती माहिती होती त्यामुळे, त्यांनीही भांजे, जब पैसे आयेंगें तब दे देना . अस म्हणत रोज विनातक्रार जेवण देण्याचे सुरु केलं, मेसमधल्या देव मामाला आम्ही जमेल तसे घरुन पैसे आले की पैसे देत होतो. खर तर गरिबी परीक्षा पाहत होती पण परीस्थीतीवर मात करायचीच मनाने ठरवलं होतं आणि माणसातले देवमाणस वेळोवेळी मदतीला धावून येत होते. मेस मधल्या देव मामाच्या हातच्या चेवणाची तृप्तता, त्यांनी त्यावेळी आमची भागवलेली भूक याला कशाचीच तोड नाही. पंचपक्वानाच्या जेवनही त्यासमोर अनेकदा पिक वाटतं.

तिन ड्रेस आम्ही दोघेही आलटून पालटून घालायचो. उंची, शरीरयष्टी सारखी असल्याने अनेकदा जीतूला तारेन आणि मला जीतू म्हणून अनेक, जण हाक मारायचे. आम्ही तेही खूप enjoy करायचो.

बीई ला असताना मी कॉलेज ख-या अर्थाने खूप enjoy केलं. अभ्यासाव्यतिरिक्त मलाच माझ्यासाठी भरपूर वेळ मिळायचा, फोन, सोशल मिडीया चा तो काळच नव्हता. फावल्या वेळेत मी Chess शिकलो, पायाला चाक लावून skating करण्यात एवढं गुंग व्हायचो जणू मला आत्ता एक एक पायरी चढायची नव्हती तर आयुष्यात भरधाव वागणे पळायचं होतं या चाक लावलेल्या स्केटिंग बोर्डसारखं. कॉलेजचा Chess champion होतोच. Chess मुळे बुद्धी चाणाक्ष, आणि बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे माझ्या मते शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने chess खेळायलाच पाहिजे. Chess helps to planning your future असं मला वाटतं. पाहाता पाहात बी.ई.चे तीन वर्ष संपत आले होते.

अभ्यास आणि मिळालेले मार्क्सचं आपली ओळख होऊ शकते, हे स्वत:च स्वत:च्या मनावर एवढ बिंबवलं होतं की स्वत:चे १००% देण्याचा प्रयत्न करायचो. फायनल इयर ला असताना GATE ची परीक्षा क्लिअर करणारा मी माझ्या डिपार्टमेंट मधला पहला व एकमेव विद्यार्थी होतो. GATE मध्ये मला 88% मिळाले होता, उच्च शिक्षणाचा ध्यास मनात ठासून भरलेला होता. MTech साठी IIT Mumbai ला ज्या दिवशी अॅडमिशन करायला जायचं होतं त्याचं दिवसांमध्ये माझी बी ई च्या फायनल इयर ची परिक्षा होती. त्यामुळे जाण शक्य नव्हतं. खरतर खूप वाईट वाटलं होतं, कारण IIT Mumbai मध्ये MTech करुन पुढे PhD साठी छान संधी मिळाली असती. हातातून खूप काही निसटताना मी उघड्या डोळ्यांनी बघत होतो पन पर्यायचं नव्हता. खरतर काही गोष्टींसाठी कधीकधी आपोआपच मार्गचं बंद होतात, पण इच्छा असली की मार्ग निघतात आणि सुटतातही.

मी स्वत:ला फार हुशार होतो असं म्हणणार नाही पण हं मी मेहनती मात्र होतो. नांदेडला कॉलेजमध्ये बी ई ला अॅडमिशन घेतली तेव्हा मला पोहायला जायचं नाही. पोहण्यासाठी पाण्यात कधी उतरलोच नव्हतो. पाण्याची भीती नाही म्हणणार पण पाण्याच्या वाट्यालाच कधी गेलो नव्हतो. किंबहूना तशी संधीच आली नव्हती. पण नांदेडला बोट चालवण्यासाठी हाती चालून आलेली संधी गमवायची नव्हती. मनाशी ठरवलं पोहणे शिकायचं, प्रयत्नपूर्वक शिकलोही. कुठलीही गोष्ट आत्मविश्वासाने दृढनिश्चयाने केली गेली तर यश हे आपलचं. कुठलाही खेळ मन लावून सकारात्मक विचारांनी खेळला, फक्त खेळला नाही तर जिंकण्यासाठी खेळला गेला तर त्याच्या जिंकण्याच्या संधी दुप्पटीने वाढतात हे मला शिकायली मिळालं.

दोन मुलांना तुम्ही पाण्यात टाका त्यात एकाला पोहायला येतं दुस-याला पोहायला येत नाही. दोघांचीही पाण्याच्या बाहेर येण्यासाठी धडपड असेलच फक्त फरक एवढाच की एकाचा प्रयत्न बाहेर पोहचण्यासाठी तर दूस-याचा भीतीपायी बूडण्याची चिंता. दोघेही हात पाय हलवतील पण, पोहता येणा-याने केलेली धडपड, हातपाय हलवण्याचा आणि श्वास रोखुन धरण्याचा, ताळमेळ त्याला सुखरुप पाण्याबाहेर यायला मदत करेल याउलट पोहणे न येणारा त्याच्या दुप्पटीने वाचण्यासाठी हालचाल करेल, दोघांचीही वाचण्यासाठी ची धडपड पण पोहता न येणारा मात्र स्वत:होऊन बाहेर येणास असमर्थ ठरेल. तेव्हा आपले प्रयतेन योग्य दिशेलाच व्हायला पाहीजे.

सायकल चालवताना दोन चाकांवर फक्त बॅलेन्स करायचं असतं हे साध समिकरण. बाकी टेक्नॉलॉजी त्यात काहीच नाही पण सराव करुन सायकल चालवणारा पडणार नाही तर. फक्तच दोन चाकांची सायकल म्हणून सायकल कडे बघितलं असता सायकल चालवणे ही वाटतं तेवढ सोप्प नाही हे लक्षात येईल. कुठलाही खेळ खेळताना आवडीने खेळत गेलो सोबतीला सराव आणि प्रबळ इच्छाशक्ती त्यातून आज प्रत्येक खेळ खेळू शकल्याचं समाधान जगतोय.

आई अशीच होती. त्या काळी फार काही गोडाधोडाचे पदार्थ घरी होत नसतं. आजच्या सारखे यू ट्यूब चॅनल ही नव्हते. आणि लग्नसोहळ्यात बनवले जाणारे गुलाबजाम, असो किंवा बालूशाही आई आवडीने घरी बनवून बघायची. बिघडेनचं ना? हे आईचं ठरलेलं वाक्य पण स्वयंपाकातील आवड आईच्या हातचा पदार्थ रुचकर बनवायचा. आवड आणि सवड असली की सगळ साध्य करता येतं म्हणतात तेच खरं.

अभ्यास किंवा यशापयशाची व्याख्या, आणि परिक्षेत मिळालेले मार्क्स हे खरं तर आपल्या बुद्धिमत्तेचे गमक असावं का? हा प्रश्न पडतो. तीन तासाच्या पेपर सोडवण्यावर आपल्या यशस्वी आयुष्याचे कवाड खोलण्यात तर कधी कायमचे बंद करण्यासाठी मदत करतात. घोकनपट्टी किंवा रट्टा मार पद्धत आपल्या यशस्वी आयुष्यात आपल्याला उच्च स्थान मिळवून देईल की पण आपण करत असलेलं काम आवडीने करतोय की मन मारुन याचं उत्तर शोधण्यात अख्ख आयुष्य जातं. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलेलं यश आनंद देतं हे मात्र नक्की.

IIT रुडकी च्या MTech च्या एंट्रन्स परीक्षेची इन्व्हिटेशन मला आलं होतं. मी लगेच तुमसर वरून २४ ताशाच्या प्रवास नंतर रुडकी ला पोहचलो. थकलेलो होतोच, परीक्षा दिली. सायंकाळी लगेच तुमसर जाण्या करिता रुडकी वरून बसने दिल्ली ला निघालो. दिल्ली वरून शेवटची ट्रेन १० ला होती.

मी लगेच तिकीट काउंटर वर गेलो आणि ५०० रुपयाची नोट तिकीट साठी दिली. दिल्ली नागपूर ची तिकीट १८० रुपये होती. मला ३२० रुपये परत देणाऐवजी त्याने मला ८० रुपये मागितले. मी जेंव्हा विचारले तुला ५०० रुपयाची नोट दिली तर त्याने लगेच खोटं १०० रुपयाची नोट दाखवली आणि मन्हाला तिथे पोलीस उभा आहे त्याला complaint कर. त्या पोलिसांचा चेहरा बघून, ८० रुपये देणेच बरं वाटले. मी कसाबसा तिकीट घेउन खचाखच भरलेल्या सेकंड क्लास ट्रेन च्या डब्यात घुसलो आणि एका कॉर्नर मध्ये उभा राहिलो. बऱ्याच थकल्यामुळे झोप सहन होत नव्हती. मी सरळ लांब सीट च्या खाली लोकांच्या पायाच्या मागे, ओल्या जागेवर झोपी गेलो. ती झोप कदाचित माझ्या जीवनातली सर्वात गाढ झोप असावी.

दुस-याच आठवड्यात नागपूरच्या VRCE मध्ये MTech in Environmental Engineering ला माझा नंबर लागला. IIT रुडकी ला पण नंबर लागला होता पण VRCE मध्ये अगोदरच फी जमा केल्यामुडे IIT रुडकी ला जाणं टाळावं लागलं.

Chapter:      VNIT, IIT-B and and Marriage Life in Mumbai

MTech त्यामानाने खूप सोप्प गेलं, जणू सगळं स्थिरस्थावर झालं होतं. पैशाची फार चणचण भासत नव्हती कारण मला 1800रुपये फेलोशिप मिळायची, तेवढे पैसे मला एकट्याला पुरुन उरत. पैसे आहेत म्हणून कर उधळपट्टी, स्वभावातचं नव्हतं. स्वावलंबनाच्या दिशेने माझं पाउल पुढे सरसावलेलं होतं. उरलेले पैसे मी घरी तर कधी जीतूलाही पाठवायचो. MTech ला माझ्यासारख्या regulars सोबत काही जागा government engineer executives साठी राखीव असतात. MTech ला माझ्यासोबत असे अनेक लठ्ठ पगाराचे गव्हर्नमेंट इंजिनियर्स होते, त्यांना पैशाला काही कमी नसायचं.

आयुष्यात पहिल्यांदाच श्रीमंतांची श्रीमंती जवळूव अनुभवायला मिळाली. रात्री मोठमोठ्या हॉटेलमधल्या पार्ट्या, त्यांचं हायफाय लाईफस्टाईलचा भाग होताना त्यांचासोबत राहून स्टेटस मेंटेन करायला लागलो असलो तरी मला माझ्या गरीब परिस्थितीची जाण होतीच. त्यामुळे रात्री बायफाय हॉटेलचे जेवण जेवलेलो मी सकाळी नागपूरच्या रस्त्यावरचे तर्री पोहे, वडापाव खावून आनंदात आणि समाधानात दिवस काढायचो. श्रीमंत मित्रांसोबत राहून त्यांच्या काय फायदा, त्या सोसायटीचा बळी मला व्हायचचं नव्हतो. अंगात पैशाचा माज चढु द्यायचा नव्हताच.

MTech ला असताना ख-या अर्थाने अभ्यासाची कला मी शिकलो, अभ्यासाची पण quality असायला हवी आपण किती वेळ अभ्यास करतो त्यापेक्षा आपण अभ्यास कसा करतो ते महत्वाचं? कमी वेळात जास्ती अभ्यास कसा करायचा त्याची technique मला शिकायला मिळाली. दिड वर्ष NEERI मध्ये project असताना तिथल्या देशकर सरांनी माझी जिद्द, परिश्रमी स्वभाव ओळखून, मला मुंबईतल्या एका Scientist चा Reference देवून त्यांना भेटायला सांगितलं. त्यांच्या नावाचं रेफरन्स असलेलं एक पत्रही त्यांनी मला दिल होतं.

MTech झाल्यावर मी सहा सात महिने नागपूरलाच जॉब केला. मोठ्ठ शहर खुणावत होतं. त्यानंतर मुंबईला गेलो, ठाण्याच्या चर्च गेटच्या एका मोठ्या कंपनीतही मी सहा सात महिणे काम केलं. थोडाफार कामाचा अनुभव मिळाला होता. या एक दिड वर्षात मी PhD चं पुरतं विसरलो होतो. आता मात्र रिसर्च करायचं मनात आलं. देशकर सरांचा रेफरन्स असलेलं पत्र माझ्या जवळ ठेवलेलं होतं. मी अमेरिकेतून PhD केलेल्या आसोलेकर सरांकडे गेलो. त्यांना देशकर सरांनी दिलेलं लेटर दाखवलं. माझा get score बघून त्यांनी मला PhD करण्याचं suggest केलं.

आणि झाला माझा PhD च्या दिशेने प्रवास सुरू. मी एक वर्ष खूप मेहनत केली, PhD करायला पाच सहा वर्ष लागतात, सर्वज्ञात असलेलं सत्य. त्यामुळे बहुतांशी मुल PhD करताना लग्न करायचे. मला तेव्हा ६,००० रु स्टायफन मिळायला लागलं होतं. आणि आता लग्न केलं तर, बरचं होईल, अस वाटू लागलं. ६,००० रुपयात दोघांचं भागलही असतं. त्यामुळे मी लग्न करायचं ठरवलं.

एका वर्षानंतर मला माझं प्रपोजल सबमिट करायची वेळ आली तेव्हा नियतीने मी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवलं होतं. तु तुझ्या PhD चं कुठलंच काम केल नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. आणि मला लक्षात आलं की आमच्या सरांनी एका वर्षात फक्त त्यांच्या प्रोजेक्टचं काम माझ्याकडून करवून घेतलं होतं. परखड शब्दात सांगायच तर मी गेल्या वर्षभ-यापासुन फक्त त्यांची हमाली करत होतो. “बळी तो कान पिळी” म्हणतात ना त्यासारखं माझं झालं होतं. गोड बोलून, संधी साधून सरांनी माझ्याकडून फक्त त्यांच काम करवून घेतलं होतं. गोड बोलून पाठीत सुरा भोसकणा-यां पासून सावधान राहायला हवं हा धडा मी तिथे शिकायला मिळाला. दुखावला तर गेलो होतो पण पर्याय नव्हता. कुलगुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यला अंगठा मागितला आणि एकलव्याने तो दिला. गुरु तो गुरुच असतो, त्यांच्यावर ना संशय घेता येत ना जाब विचारता येत.

जीतू वर माझाही खूप विश्वास. छानसं बॉन्डींग तयार झालं होतं दोघांमध्ये. तस तर पाचही भावंड दादांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या हाताच्या मूठीप्रमाणे होतो. लग्नासाठी मुली बघायला गेलेला किस्सा. मी मुंबईवरुन मुली बघायला आलेलो होतो. जीतु माझ्यासोबत होता. मामाने मुली शॉर्टलिस्ट करुन ठेवल्या होत्या. एका रविवारी पोरी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. चहा पोह्याचा कार्यक्रम. आईदादा तुमसरवरुन आलेले होते. आम्ही मुलगी बघायला गेलो. शिकलेली असावी, बाकी फार काही अपेक्षा नव्हत्याच. मुलगी बरी होती, पण जीतू कानात कुजबूजला. भाऊ, ये नही जचेगी!!! जोडी कैसे . Made for each other लगनी चाहिये. अशा तीन चार पोरी एकाच दिवशी पाहून आम्ही नागपूर वरुन तुमसरला परतलो. पोरीबाबातच विश्लेषण आणि त्यावरूनहोकार नकार सगळं जीतू जातीचे ठरवत होता.

मुंबईला जाण्याचा दिवस जवळ आला तरी, मुलगी पसंत पडत नव्हती. दुस-यावेळी येईल तेव्हा बघू म्हणून सायंकाळी असचं बसलेलो असताना, अपर्णा माझी बायको, तिची आज्जी अपर्णाचा निरोप घेवून आली, उद्याच जायचयं मग कशी बघणार मुलगी, आम्ही नाही सांगितलं, आज्जीने आग्रह केला. सकाळी सकाळी मुलगी बघून घ्या मग जा. सकाळी सकाळी मी दादाजी, आणि जीतू आणि भंडा-यालाच राहात असलेला मित्र प्रशांत आम्ही मुलगी बघायला गेलो.

सुंदरशी साडी नेसलेली अपर्णा पोह्याचा ट्रे घेवून आली, आणि जीतू कुजबूजला. Yes  . ये एकदम सही . मलाही एका नजरेत आवडली अपर्णा . लगेच आईला आणि भावांना बोलावलं. सगळ्यांनी पुन्हा अपर्णाला बघितलं, प्रशांतच्या घरी बसून मिटींग झाली आणि अपर्णाला होकार देण्यात आला. दोन हाताची चौकट करुन जीतू हसत बोलला. अपर्णा + तारेंद्र made for each other. असं आमचं लग्न ठरलं.

आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळायलाच हवं. लग्नाची तारीख ही जवळ येत होती. आता PhD करण्यात मन लागत नव्हतं. मनात विचारांच काहूर माजलं. असचं चालू राहिलं असतं, तर माझे PhD करण्यात अनेक वर्ष वाया गेले असते. आठ आठ दहा दहा वर्ष झिजूनही PhD न मिळालेले अनेक मुल मी frustrated झालेली मी बघितली होती. मनात गोंधळ सुरु झाला. काय करावं कळेना, नोकरी करावी की PhD? या संभ्रमात असतानाच, लग्नासाठी तुमसरला जायच्या पहिले मी एका कंपनीत इंटरव्ह्यू देवून आलो होतो. लग्न २१ डिसेंबरला होत १८ डिसेंबरला आल्याआल्या अपर्णाला मी PhD सोडण्या बाबत सांगितलं.

तिच्यासाठी खरं तर धक्कादायक होतं, पण तिनेही परिस्थिती सांभाळून घेतली. ऐन लग्नाच्या वेळी असे झटके पचवणं जरा कठिण होतं त्यामुळे एवढ्यात तरी तिच्या घरी न सांगण्याचा तिने निर्णय घेतला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. मी दिलेल्या इंटरव्ह्यूच्या नोकरीचे कन्फर्मेशन लेटरही घरी आलं होतं. PhD सोडून नोकरी करण्याचा आत्ता मी निर्धार पक्का केला. लग्न झाल्यावर तिच्या आणि माझ्या घरी PhD सोडण्याबाबत बोललो. त्यांचीही साथ मिळाली. मुंबईत मित्राला फोन करुन फ्लॅट शोधायला सांगितला. लग्न झाल्या-झाल्या आठवड्याभ-यात मी आणि अपर्णा मुंबईला आमच्या फ्लॅटवर शिफ्ट झालो.

नोकरीत काही दिवसात रुळल्यानंतर मी सरांना PhD सोडत असल्याचं सांगितलं. स्वत:चं नुकसान करत असल्याबाबत त्यांनी खूप सुनवलं. खरतर नुकसान कोणाचं होणार होतं, हे कळण्याएवढा मी दूधखुळा नक्कीच नव्हतो. त्यांचं फुकटात काम करणारा एक मेहनती, हुशार, बेरोजगार हमाल कमी होणार होता त्यामुळे त्यांची नाराजी व्यर्थ नव्हती. आणि मी PhD सोडली.

लग्न, नोकरी सगळं स्थिरस्थावर झालं होतं. पण PhD करण्याची मनात कुठेतरी एक सल राहून गेली होती. PhD म्हणजे माझं पूर्णत्व होतं, मी पाहिलेलं स्वप्न होतं. आणि स्वप्नांचा पाठलाग केल्याशिवाय मला करमत नव्हतं. एक प्रकारे अधूरं-अधूरपण जाणवायला लागलं. डॉक्टरेट डिगरीपुढे हार माणल्यासारखं वाटलं. हार माणणं स्वभावातच नव्हतं. परिस्थितीशी झगडलेल्या मला हार माणायचीच नव्हती. पुन्हा PhD करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.

एव्हाना जीतूचं इंजिनिअरिंग करुन पुण्यात काही महिने नोकरी करुन तो अमेरिकेत पोहचला होता. एक दिवस फोनवर बोलता बोलता तो म्हणाला, भाऊ तुझं शिक्षण आणि तुझा GATE Score ही चांगला आहे, एवढे सगळे लोक इकडे शिकायला, नोकरी करायला येतात, तु पण प्रयत्न कर अमेरिकेत येवून शिकण्याचा. लग्नाला दिड वर्ष झालं होतं. बारा पंधरा तास ऑफिसच्या कामातून PhD साठी वेळ काढणं शक्य नव्हत. अपर्णा ही pregnant होती, तीही तुमसरमध्ये आलेली होती. मी घेतलेल्या निर्णयाला कदाचित तिने पाठिंबा दिलाच नसता त्यामुळे, मी तिला न सांगता पुन्हा एक रिस्क घ्यायची ठरवली. आणि मी माझी नोकरी सोडली.

GRE आणी TOFEL चे क्लासेस सुरु केले. क्रांतीचं बीई झालं होतं, त्याचही लग्न झालं होतं. आरती आणि क्रांती मुंबईत येवून ते दोघेही GRE साठी माझ्यासोबत preparation करु लागले. आम्ही तिघांनी मिळून क्लासेस लावले. रात्री landline internet चे rate कमी राहायचे त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या देशातल्या (USA, Canada, UK, Australia and New Zealand) जवळजवळ ५०० च्या वर प्रोफेसर्स ला आमच्या application submit केलेल्या होत्या. तोवर आमचा GRE चा Score ही आला. मला दोन-चार प्रोफेसर्स करवी अमेरिकेतून PhD साठी approach केलं गेलं. आणि मी जायचं ठरवलं.

आस्था दहा महिन्याची असेल तेव्हा मला अमेरिकेत PhD साठी अॅडमिशन मिळाली. माझं आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अमेरीकेला जायचं ठरलं. मी एकदा का अमेरीकेला गेलो असतो त्यानंतर जवळपास दोन एक वर्ष मला येता येणार नव्हतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, जितु म्हणाला भाऊ तू एकदा अमिरेकेला आलास की तुला निदान दोन वर्ष तरी भारतात येता येणार नाही. जीतूचही लग्नाच्या वय झालं होतं. त्यामुळे मग मी जायच्या पहिले त्याचं लग्न उरकायचं ठरलं. आमच्याजवळ दोन आठवडे होते, दोन आठवड्यात मुली बघून, लग्न कस काय होणार हा प्रश्नच होता खर तर?

जीतु पुढच्या आठवड्यात येणार म्हणून आम्ही त्याच्यासाठी पहिलेच मुली बघून ठेवल्या नागपूर, गोंदिया, भंडारा, रामटेक, जवळजवळ ८ मुली आम्ही बघितल्या त्यातून एकीला मागणी घालायची ठरलं. जीतू आल्या लगेच आम्ही त्याला त्या मुली दाखवायला सुरुवात केली. सकाळी निघून एका दिवसात चार मुली अशाप्रकारे आम्ही आठही मुली बघितल्या. मुली बघण्याचा प्रोग्राम जरा हेक्टिक होता पण पर्याय नव्हता. त्यातल्या दोन मुली जीतूने पसंत केल्या, एक मुलगी गोंदिया आणि दुसरी नागपूरची होती. दोनही मुली चांगल्याच होत्या, नागपूरची मुलगी कॉम्पुटर इंजिनियर, दिसला सुंदर होती, त्यामानाने गोंदिया ची मुलगी सिव्हिल इंजिनियर झालेली पण रंगाने थोडी सावळी होती. कम्प्युटर इंजिनियर असलेली नागपूरच्या मुलगी जीतूला पसंत पडली.

गोंदियाची मुलगी आम्ही बघायला गेलेलो असताना, आमच्या सोबत असलेल्या गाडीच्या ड्रायव्हर साठीही त्या मुलीने पोहे आणले, आत बोलवून ड्रायव्हरला तिने पोहे दिले. आणि मला तिच्यातली ही गोष्ट खूप आवडली. कारण घरपण जपणारी, समाजाचं भान ठेवणारी मुलगी छान घरं सांभाळते. हा माझा विश्वास आणि आमच्या घरासाठी अशीच मुलगी योग्य होती. लग्न घाईत होणार असला तरी कुठलाच निर्णय चुकायला नको होता. त्याला माझी बाजू समजून सांगितल्यावर, रात्रभर चर्चा झालू. अखेर जीतुला माझं म्हणणं पटलं, म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गातुनच बांधून आलेल्या असतात आपण फक्त निमित्त मात्र असतो. ज्याच्या नशिबात जी मुलगी असेल ती त्याला मिळतेच मिळते, आणि तशीच परिस्थितीही तयार होते. आणि आम्ही गोंदियाच्या मुलीला होकार द्यायचा ठरवलं.

रंग आणि सौंदर्य हे काही काळापुरतीच असत, मनाची सुंदरता महत्वाची असते हे माझं ठाम मत. सकाळी जीतुने मुलगी पसंत असल्याचं संगितलं. मी लगोलग घरच्या सगळ्यांना सांगून गोंदियाला मुलीकडे फोन केला, सातच्या ट्रेन ने त्यांना मुलीसह, पुढली बोलणी करायला तुमसरला यायचे निमंत्रण दिले. त्यांच्या परीने आमची माहिती पहिलेच काढलेली होती. गरीब घरातून स्वकष्टाने पुढे गेलेले मुलं असल्यामुळे कुठलाच काही प्रोब्लेम त्यांना वाटला नसेल कदाचित. दिशा आणी तिचे आईबाबा तुमसरला आले. त्यांना सगळी परीस्थिती समजावून सांगितली. आणि त्याच दिवशी १० वाजता कोर्टात लग्न करायचं ठरलं.

दिशाचा पासपोर्ट नव्हता, आणि लग्नानंतर जीतुसोबत ईशालाही अमेरिकेला जावं लागणार होतं. पासपोर्ट मिळणं महत्त्वाचं होत, मी माझ्याच एका भावला दोघांचीही कागदपत्र घेऊन कोर्टात पाठवलं, त्याने कोर्टातली सगळी प्रोसिजर केली. हार, मिठाई आणि कोर्टात जीतू आणि इशारा लग्न झालं. लग्न ठरल्यानंतर केवळ चार तासात जीतुच लग्न झालेलं होत.

घरी नाश्ता पाणि जेवण झालं, आणि त्याच दिवशी दुपारी आम्ही नागपूरला पासपोर्टसाठी अप्लाय केला, घरी आईने पंडिताकडून मुहूर्त काढून ठेवला. Verification साठी पेपर्स गोंदियाला पाठवले, तेवढ्यात तिसरा नंबरचा भाऊ बालूने स्वत:च्या लग्नाबाबत सांगून टाकलं. त्याला आधिच मुलगी पसंत होती, आणि ठरलं त्याचही लग्न आटोपून घ्यायचं. आम्ही तशीच गाडी नागपूरच्या दिशेने पुन्हा वळवली. नागपूरला गेलो बोलणी केली, त्यांना सगळं समजावून सांगितलं. तडकाफडकी लग्न हा त्यांच्यासाठीही धक्काचं होता. कुठलेही आढे-वेढे न घेता. “मिय्या बीबी राजी तो क्या करेगा काजी” याप्रमाणे बालू आणि स्नेहलच लग्न गुरुवारीच उरकून घ्यायचं ठरलं.

Chapter:      बालू जीतूचं लग्न, आणि अमेरिका journey

“मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी”, अशाप्रकारे बालू स्नेहलचही लग्न पक्कं झालं. लगातार दोन दिवस नागपूरला शॉपिंग झाली. दिशा, स्नेहल बालू आणि जीतू यांचाबरोबरचं मला अमेरीकेत लागणा-या काही गोष्टी ज्या अजून खरेदी करायचा राहील्या होत्या त्या सगळ्या घेतल्या. इकडे तुमसरला आईने घरी लग्नाची सगळी तयारी केली, नातेवाईकांना फोन करून लग्नाचं निमंत्रण दिल. एवढ्या घाईत का? कुठ? कसं? नातेवाईकांच्या अशा अनेक प्रश्नांना आईला न गोंधळात उत्तर द्याव लागलं. आईची अजून एक गोष्ट मला खूप आवडते. आई प्रथा, परंपरा किंवा लोक काय म्हणतील? वगैरे यात फार अडकत नाही, काळानुरुप बदल तिने विनातक्रार सहज आत्मसात केले.

अंथरून पाहून पाय पसरावे या संस्कारांमध्ये आम्हाला वाढवताना, वेळ, जबाबदारी आणि कर्तव्याची सांगड आयुष्याशी कशी घालायची यात जणू आईने PhD संपादन केली होती. मुलांवर विश्वास ठेऊन त्यांच्या उपलब्ध वेळेप्रमाणे वागायला आईला आवडत होत त्यामुळे निर्णय घेणं सोप्प झालं. कोणत्याही गोष्टीच अवडंबर तिने कधी केलेच नाही.

लग्नाची तयारी झाली, आणि लग्नाचा दिवस म्हणजे गुरुवार उजाडला. जीतूची वरात सकाळी आठ वाजता गोंदियाला निघाली. दहा वाजता मंगलाष्टके आणि सुलग्न लागलं. सप्तपदी वगैरेला वेळ लागणार होताच तेव्हा छोटू आणि एका गाडीत काही जणांना जेवण खावन करून आईसोबत तुमसरला पाठवलं. त्याचं दिवशी सायंकाळी बालूच लग्न असल्या कारणाने, आईने घरी आल्यावर बालूला हळद लावली, आणि नवरदेव तयार केला. दोन वाजेपर्यंत जितू आणि दिशाची वरात घेऊन आम्ही तुमसरला घरी पोहचलो. दिशाचा गृहप्रवेश झाला. लगेच जरा फ्रेश होऊन बालूची वरात नागपूरला निघाली.

आईने घरी लगेच जीतूची हळद काढली, नान्होरा उरकवला आणि लग्नासाठी आई नागपूरला आली. नागपूरला पासपोर्ट ऑफिसमध्ये माझं एक काम होत, मी लग्नानंतर जरा जाड झालो होतो, डोक्याचं टक्कल पडलं होतं, इंटरनॅशनल एअर पोस्टवर विनाकारण पोसपोर्टचा कुठला प्रॉब्लेम नको, म्हणून पासपोर्ट चार पाच वर्षाकरता व्हॅलीड असताना सुद्धा, मी पासपोर्टवरचा फोटो change करायचा ठरवलं. पासपोर्ट ऑफिसमधलं सगळं काम आटोपून मी लग्नमंडपात ७.३० वाजता पोहचलो, लग्न लागतच होतं. जेवण आटोपून बालू आणि स्नेहलची वरात तुमसरला निघाली. स्नेहलचा ही गृहप्रवेश झाला. आठ दिवसात लग्न जुळवून, निर्विघ्नपणे दोन्ही लग्न उत्तमप्रकारे पार पडल्याचं समाधान घेवून रात्री झोपी गेलो. आठवड्याभ-याची दगदग एवढी की सगळेच थकले होते, “चट मंगनी पट ब्याह” या उक्तीचा खरा अर्थ कदाचित हाच असावा नाही का? सगळेच इकडे-तिकडे पेंगत होते. गप्पा-गोष्टींमध्ये तो दिवस कसा गेला कळलच नाही.

मी अमेरीकेला येण्यापूर्वीच, काही दिवसांपूर्वी मला सरांचा e-mail आला होता. काही कारणाने त्यांना मला पूर्ण फेलोशिप देता येणार नव्हती. खाण्यापिण्याचा आणि ट्यु़शन फीस एवढीच फेलोशिप ते मला देणार होते. काय आणि कसं करायचं पुन्हा प्रश्न पडला? पण आता अमेरीकेला यायचा निर्धार पक्का होता. प्रत्येकाची एक बाजू असतेच आपल्याला वरवर दिसणाऱ्या सागळ्याचं गोष्टी आपल्याला जशा हव्या तशा कशा असतील? आणि खरं तर संघर्ष करताना आणि स्वप्नांचा उंच पल्ला गाठताना, चांगल्या वाईट परिणामांसाठी आपण तयार असायला हवं, धीर सोडून नाही तर धैर्याने तोंड देण हेच आपल्या हाती असतं.

पूर्ण फेलोशिप मिळाली असती तर चिंताच नव्हती. पण एवढ्या कमी फेलोशीप मध्ये नवीन देशात अपर्णा आणि छोट्याशा आस्थाला सोबत घेवून येण जरा अवघड वाटलं. खूप विचार करुन शेवटी ठरवलं. मी एकटाच पहिले अमेरिकेला जाणार आणि सगळं स्थिरस्थावर झालं की नंतर दोघींना तिकडे बोलावणार. घरच्यांनी पण माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला.

सायंकाळ झाली, आता मात्र माझी तयारी सुरु झाली दुसर्याच दिवशी मला मुंबईला पोहचायचं होतं. आजपर्यतचा मैलोनमैलचा प्रवास एकट्यानेच तर केला होता, जणू प्रवासाची अंगवळणी सवय होऊन बसली होती. पण आज माझ्यासाठी सगळं कठीण होतं. डोळ्यासमोर एकीकडे होती मी पाहिलेली स्वप्न, माझं उज्वल भविष्य, मला मिळत असलेली संधी तर दुसरीकडे, माझी सगळी माणसं, अपर्णा, आणि आठ महिन्याची माझी छोटीशी लेक आस्था. या सगळ्यांना इथेच सोडून मला एकट्यालाच सातासमुद्रापार अमेरीकेला जायचं होतं. आजपर्यंतच्या प्रवासात कुटुंबाची साथ हिच माझी हिंमत होती. स्वत:लाच कमजोर होऊ द्यायच नव्हतं. मनावर दगड ठेवून घेतलेल्या निर्णयाची पूर्ती करण्याची वेळ जवळ जवळ येत चालवली होती. जसजशी वेळ पुढे जात होती, तसतसा मी घेतलेला निर्णय बरोबर की चूक? अशा अनेक प्रश्नांचं काहूर मनात माजत होतं. शेवटी मन पक्क केलं !!

आईवडिलांचे, सासूसास-यांचे आशिर्वाद घेतले. आस्थाला डोळे भरुन पाहिलं. मला जाताना पाहून अपर्णाचे डोळे पाणावले माझ्या डोळ्यातला आसवांना मी कसंबसं रोखून धरलं, कारण मला त्या सगळ्यांनाच डोळ्यात साठवायचं होतं. अखेर मी मुंबईला रवाना झालो. एक मुलगा, एक नवरा, आणि एका आठ महिण्याच्या बाळाचा बाबा. डोळ्यातलं पाणी डोळ्यातचं आटवून स्वप्नांच्या जगात गिरक्या मारायला चालला होता. आयुष्याच्या विविधरंगी छटा अनुभवलेला आज एक तारेंद्र त्याच्याच माणसांच्या डोळ्यात तेवत असलेल्या स्वप्नांचा पाठलाग करायला चालला होता. दूरदेशी स्वत:चं जग निर्माण करायला चालला होता.

ऑगस्ट मध्ये सगळ्या अमेरीकेच्या तिकिट्स बुक होत्या. मला मंगळवारी कोणत्याही परीस्थितीत अमेरिकेला पोह्चायचं होत, अखेर रात्री ८.३० वाजता खूप प्रयत्नांनी तिकीट कन्फर्म झालं. त्याच दिवशी रात्री १.३० वाजताची फ्लाईट होती. साता समुद्रापार, अमेरिकेला जाणार पण राहाणार कुठे आणि कुणाच्या घरी, कोणीच ओळखीच नव्हत. आज सारखं तेव्हा जग इंटरनेटच्या इशा-यावर चालतं नव्हतं. घरोघरी इंटरनेटचा तो जमानाच नव्हता. त्यामुळे तडक, इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. माझ्या एका मित्राचा आणि अपर्णाच्या चूलत मावस भावाचा पत्ता, फोन नंबर सापडला. त्यांना एअरपोर्ट वर घ्यायला या म्हणून सांगितलं. रविवारची फ्लाईट पकडून मी सोमवारी अमेरिकेला पोहचलो. माझं नशिब चांगलं की दोघेही मला एअरपोर्टवर घ्यायला आले होते. मी अपर्णाच्या मावस भावाच्या घरी रात्रभर राहून दुस-या दिवशी कॉलेजला पोहचलो.

अमेरिकेत ध्येय गाठण्यासाठीच्या स्वप्नांचा प्रवास सुरु झाला. ख-या अर्थाने विरह? तो मी आता अनुभवत होतो. माझ्याजवळ सगळं असूनही, ओंजळ रिकामीच होती. खरच स्वप्न एवढी मोठी असावीत का? अनेकदा मीच मला प्रश्न विचारायचो. आजपर्यंत केलेल्या कष्टाच कदाचित तेच उत्तर होतं. “वृंदावनातून द्वारकेला निघालेल्या कृष्णाच्या मनाची घालमेल आज मला माझी वाटत होती”. सुख-दु:ख विरह, वेदना यात देव नाही सुटले, त्यामानाने आपलं अस्तित्व शून्यचं!! मी वारंवार मनाला समजवत असलो तरी अपर्णा आणि आस्थाला तिथे सोडून येणं त्यामानाने सोप्प नव्हतं. विचाराने, आठवणीने, आणि एकटेपणाने अनेकदा डोळे डबडबायचे. मग माझ्या पाणावलेल्या डोळ्यातले अश्रुच मला उत्तर देत. मला धीर देत. सुख दु:खात आणि अनेकदा एकटेपणाने खचलेल्या मनाला या अश्रूंचीच तर साथ होती. माणसाला प्रत्येक परिस्थितीत अश्रू सोबत करतात . आपणच आपलं ठरवायचं कशात डूबायचं आणि कशात विव्हळायचं? मनातल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची सांगड प्रत्येकाला घालताच आली पाहीजे. आपलं कुटूंब आपली कमजोरी नाही तर आपली ताकद जेव्हा होते. तेव्हा पाणावलेल्या डोळ्यातले अश्रू दाटून आलेल्या आठवणींना उत्स्फुर्त पणे आपलं काम प्रामाणिकपणे करत राहाण्याची स्फूर्ती देते.

मी अमेरीकेत आल्यावर आठ महिन्याची माझी लेक, आस्था, मी दिसत नसेल म्हणून, बाबा बाबा करत अनेकदा रडली असेल. तिच्या छोट्या छोट्या डोळ्यांनी मला अनेकदा शोधलंही असेल. इवलंसं छोटसं कोकरू मला शोधण्यासाठी सैरभैर घरभर, शोधत फिरलं असेल. पण हा दूरदेशी गेलेला बाबा मात्र तिला भेटण्यासाठी आतुर असूनही असफलच होता. दु:खाच्या लाटेला आनंदाची किनार लावली की दु:ख कमी होत. तेच मी करत होतो. आता मी स्वत:ला पूर्णपणे अभ्यास आणि रिसर्च मध्ये गुंतवून घेतलं. दिवसरात्र काम त्यामुळे मनाच्या हळव्या कोप-यात कधीही न विसरु शकणा-या माझ्याच माणसांची आठवण काढायला ही अनेकदा माझ्याजवळ वेळ नसायचा.

एका आठवड्यानंतर, एक आनंदाची बातमी समजली. मला मिळणारी फेलोशिप फुल करण्यात आली होती. अपर्णाला सांगितलं तुला इकडे येवून शिकायचं आणि नोकरी करायची इच्छा असेल तर तू ही प्रयत्न कर. तिनेही पुढे शिकण्याची इच्छा दर्शवली. तुमसर वरुन नागपूरला अप-डाऊन करुन अभ्यास तेवढ शक्य झालं नसतं. अपर्णा आईसोबत एक रुम करुन नागपूरला राहीली. आईने आस्थाला खूप छान सांभाळलं. त्यामुळे अपर्णाला अभ्यासाकडे नीट लक्ष देता येत होतं.

अमेरिकेला डीग्री करायची, आणि पुढे शिकायचं असेल तर, मग आस्थाचं कसं? तिला सांभाळायचा प्रश्न उभा राहिला? न्युयॉर्क सारख्या महागड्या देशात शिक्षणासोबत आमच्या खर्चाचं गणित माझ्या फेलोशिपमध्ये बसवायचं होतं. दूरदेशी राहून छोट्या मुलीला सांभाळून शिक्षण सगळचं कठीण झालं असतं. बेसमेंट मध्ये अगदीच छोट्याशा रूम मध्ये आम्ही दोघे कसेबसे राहायचो. त्यामुळे तिच्या योग्य देखरेखीसाठी आम्ही आस्थाला भारतातच आईजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.

जवळजवळ वर्षभ-यानंतर GRE पास करुन, अपर्णा डीग्री करणासाठी ऑगस्ट महिन्यात आस्थाला भारतातचं आईजवळ सोडून, एकटी अमेरिकेला आली. काळजावर दगड ठेवावे लागतात म्हणतात ना त्याचा अर्थ आता आम्हाला कळत होता. आईच्या सहनशिलतेला, आईच्या मदत करण्याच्या भावनेला, आई बनून नातीला सांभाळणाऱ्या माझ्या माऊलीला त्रिवार वंदन. आईने अगदी सहजपणे एका दिड वर्षाच्या मुलीची जबाबदारी घेतली. छोट्या मुलांना सांभाळण तसं खूप चॅलेंजिंग असतं. आईने कुठलेही आढेवेढे न घेता आस्थाची संपूर्ण जबाबदारी अगदी सहजपणे स्विकारली, सांभाळली आणि पेललीही.

आईबाबा म्हणून लेकीला सोडून राहाण आमच्यासाठी, जेवढं कठीण होतं त्याहीपेक्षा आईबाबंशिवाय राहणाऱ्या माझ्या लेकीसाठी ते कैक पटीने अवघड झालं असावं. मायेचं पांघरुन घालणारी आजी मात्र होती, ती तिला अंतर देणार नाही तर तिला आपल्या पोटच्या लेकीसारखं सांभाळेल हा आईवरचा विश्वास, आम्हाला पुढचे निर्णय घेण्यासाठी पुरेसा होता. म्हणतात दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जास्त, जपलं जातं तसचं झालं होतं. आईने आस्थाला लाडात वाढवता वाढवता अक्षरश: लाडावून ठेवलं होतं.

त्या दीड-दोन वर्षात घरच्या सगळ्यांनीच खूप साथ दिली. त्यांच्या साथीमुळे आम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून आमचं ध्येय साध्य करु शकलो. “कूछ पाने के लिये कूच खोना तो पडता ही है”, हे सर्वज्ञात वाक्य आमच्या आयुष्याचं ब्रीदवाक्यच झालेलं होतं. माझी PhD, आणि अपर्णाची डिग्री पूर्ण झाली. दोन वर्षांनी मी भारतात येऊन आस्थाला घेऊन अमेरिकेला आलो. तिच्या लडिवाळ बालपणातल्या खूप गोड आणि सुंदर बाललीलांना आम्ही दोघेही मुकलो होतो. तीचं धावता धावता पडणं, पडून उठणं, तिचे बोबडे बोल, तिचं हसण खेळण, बागडणं, यातलं आम्हाला काहीच अनुभवायला मिळालं नव्हतं.

तिला दोन अडिच वर्षानंतर, पहिल्यांदा पाहिल्यावर गहिवरून आलेल मन, फुटलेला मनाचा बांध हा शब्दातीत करणच अशक्य. एवढंच म्हणेल आमच्या संघर्षाचा अनमोल हिस्सा आमची आस्थाही होती. तिच्याशिवाय आमचा संघर्ष अधुरा होता. सातासमुद्रापार दूर देशात माझं पूर्ण कुटुंब आता माझ्याजवळ असणारं होतं.

अनेकदा आईवडिलांना खूप कठोर निर्णय घ्यावे लागतात. अनेकदा आपल्याला निर्दयी पालक म्हणून इतरांकडून कढड्यात उभं केल जातं. पण याचा अर्थ ते पालक निष्ठुर असतील असं नसतं. तर त्यांना भावनिक दृष्ट्या हळवं होऊन चालणार नसतं. आपली लेकरं ख-या अर्थाने आपल्या जगण्याचा मार्ग असतो. माया ममता प्रेम, जिव्हाळा या पलीकडे जाऊन मुलांना शिस्त लावताना कधीकधी रागवावं लागतंच. आईवडिलांची जागा या दुनियेत कुणीच घेऊ शकत नाही? त्यांचं प्रेम स्वत: आईवडील झाल्याशिवाय कळत नाही तेच खरं. 

 Chapter:     India Trip

बालूला चवथ्या नंबरच्या भावाला, स्नेहल पहिले पासूनच आवडायची, लग्न ठरलं तेव्हा, स्नेहलने आईला तिच्या आयुष्यातलं एक कठोर सत्य सांगितलं. तिच्या अॅपेंडिक्सच्या ओपरेशनमुळे की काय डॉक्टरांनी ती कधिच आई होऊ शकणार नाही असं सांगितलं होतं. ती लपवू पण शकत होती, पण तिचा खरेपणा. लग्नासाठी नकार द्यायला एवढं कारण पुरेसं होतं. तिने आईला सगळं खरं खरं सांगून टाकलं. आईने ही गोष्ट अतिशय सहजपणे हाताळली. तुम्ही दोघेही एकमेकांना आवडता ते महत्वाचं, तुमचं एकमेकांवरचं प्रेम महत्वाचं, तुम्हाला मुल होणं महत्वाचं असलं तरी, बाळ होणार नाही म्हणून तुला नकार देण्याइतकं तरी ते कारण मला मोठ वाटतं नाही असू सांगून स्नेहलच्या पाठीवर मायेनं हातं फिरवून आईने तिच्या आणि बालूच्या लग्नाला होकार दिला. आईच्या मनाचा मोठेपणा खूप काही शिकवून गेला. दहा वर्ष दवाखाना औषध, आणि सगळ्या मोठमोठ्या ट्रिटमेंट घेवूनही, स्नेहलचं आईपण सुनसुन होतं.

एकापाठोपाठ, मुली होतात म्हणून, तीन मुलींच्या पाठीवर, यावेळीही मुलगीच होईल म्हणून अॅबॉर्शन करायला निघालेल्या आईच्या दूरच्या नातेवाईकाच्या मुलीला, आईने तुला मुलगी झाली तर आम्ही तिचा सांभाळ करु म्हणून सांगितलं. आईने पोटातल्या बाळाला जीवनदान दिलं. आई होण्याचं सुख स्नेहलला मिळालं. बालू आणि स्नेहलने रितसर बाळाला दत्तक घेतलं. स्नेहल बाळाचा छान सांभाळ करेल हा आईचा स्नेहलवरचा विश्वास स्नेहलला आईच्या अधिकाधिक जवळ घेवून गेला. आणि स्नेहल आई झाली. आईचे विचार, आईचे मत आणि आईचा परीस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन खरचं वाखाणण्याजोगा, प्रेरणा देऊन जातो. आईचे सकारात्मक विचार आईबरोबर आम्हालाही समृद्ध करतात. खरच खूप गर्व होतो मी आईचा मुलगा असल्याचा. आमच्या घरच्या पाचही सुनांमध्ये आईचा स्नेहलवर आणि स्नेहलचा आईवर खूप जीव. ती आईला जपते, सांभाळते आणि काळजी घेते म्हणून आम्हाला आईची फार काळजी नसते. त्यामुळेच की काय पण आम्ही निश्चिंत असतो. आईचं अनेकदा फोनवर बोलणं होतं. दादाजींनी फोनवर बोलायला लागले की, थोडंफार जुजबी, इकडलं-तिकडलं बोलून आईला फोन देताच पण आईच्या शब्दांचा आधार आम्हाला बळ आणि जगण्याची नवी उमेद देतात. बरं नसलं की आईला न सांगता सगळं कस काय कळतं हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय. एक आई आपल्या लेकराला जेवढं ओळखते तेवढ या जगात दुसरं कुणीच ओळखू शकत नाही. आईसाठी तिची लेकरं सारखी मग ते एक असू देत की पाच. आईचं प्रेम अंगावर उबदार मायेचे पांघरुण घालते हे मात्र सत्यच. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”. रामदास स्वामींच्या या वाक्यात आईपणाचं सार्थक दडलेलं आहे.

पाचव्या नंबरचा भाऊ, पाच वर्ष झाले तरी इंजिनियरिंगची पदवीत जरा मागे पडला? सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच जमल्या असत्या तर आज सगळेच इंजिनीयर डॉक्टर नसते का राहीले? त्याने इंजिनियरिंग सोडून दिलं. भंडा-याला BSc करण्याचा प्रयत्न देखिल केला. कदाचित त्याचे प्रयत्न कमी पडले असावेत पण आईने त्याला त्याच्या कमजोर बाजू सहीत सांभाळून घेतलं. तो बालूसोबतॉ घरच्या कम्प्युटर इंस्टीट्यूट मध्ये काम करु लागला. आत्या कडे राहात असलेल्या, परिस्थितीने गरिब असलेल्या मुलीबरोबर, अगदी दोन्हीकडला खर्च करुन आईने दोपर्ती छोटूचं लग्न लावून दिलं.

सगळं व्यवस्थीत चालू होतं. पण सुख दु:ख ही उनसावलीप्रमाणे आपल्या सोबत राहातातच. म्हणतात ना दु:ख अनुभवल्या शिवाय सुखाची किंमत कळत नाही तसच होतं. आयुष्यात तब्येतीच्या तक्रारी कुणालाच सुटल्या नाहीत . छोटूची तब्बेत एकाएक खालावली. त्याच्या दोन्ही किडन्या डॅमेज झाल्या होत्या. त्याची बायको, एक छोटासा मुलगा आईदादांना छोटूची नेहमी चिंता राहायची. त्याच्या तब्बेतीचा परिणाम की काय? आईच्या ही तब्बेतीच्या कुरबुरी वाढल्या होत्या. मी नेपाळच्या प्रॉजेक्टसाठी आलेलो. भारतात तुमसरला घरी आल्यावर पाच फुट सात इंच भावाचं वजन ३५ ते ४० च्या घरात गेलेलं बघून जरा अचंबित झालो. आता त्याच्याकडे जरा लक्ष देणं गरजेचं होतं. त्याला अॅडमिट करुन मी अमेरीकेला गेलो पण मन माझे त्याच्या विचारात घुटमळत होतं. जीतू आणि क्रांतीला फोन केला, आणि घरची परिस्थिती सांगितली. आता वेळ दवडायची नव्हती. होत्याचे नव्हते होण्याच्या आत आम्हाला पाऊल उचलणे गरजेचं होतं.

आम्ही आठ दिवसांसाठी तिघेही भारतात आलो. काही आजारांचं मूळ कारणचं आपल्या मनाशी जुळलेलं असत. मनाने स्वस्थ असणारा माणूस उपचाराला लवकर प्रतिसाद देतो. मनाची ताकद महत्वाची असते आणि छोटूच्या बाबतीत त्याची चिंताच त्याला आजार बरा करण्यासाठी अडसर ठरत होती. आपल्या कुटूंबाची, मुलाची चिंता आणि तब्बेतीमुळे असहाय्य असलेला आमचा छोटा छोटू आजारी पडला होता. त्याची ती अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटतं होतं. त्या सात दिवसात आम्ही पाचही भावंडांनी एकत्र वेळ घालवला. इतर कुठेही न जात, तु एकटा नाहीस तर आम्ही तुझ्या सोबत आहोत हा नैतिक आधार दिला. आम्ही सगळ्यांनी मिळून, बालूच्या पूढाकारात पुन्हा एक निर्णय घेतला. आम्ही भावांनी तुमसरचं एक घर छोटूच्या नावाने करुन द्यायचं ठरवलं. त्याच्या खात्यात पैसे ठेवून त्याला स्वत:च्या तब्बेतीकडे लक्ष दे म्हणून बजावलं. कारण किडन्या गेल्या असल्या कारणाने त्याला दगदग करता येणार नव्हती. एक दिड वर्ष त्याच्या खाण्यापिण्याकडे औषध आणि उपचाराकडे लक्ष देवून हळूहळू तो बरा होऊ लागला.

बालूच्या ट्रीटमेंट च्या वेळी, आम्ही सगळे घरी जमलेलो असताना. एकीकडे छोटूच्या तब्बेतीची काळजी तर दुसरीकडे आम्हाला सगळ्यांना एकत्र पाहून आईच्या, आपलं सगळ कुटुंब एकत्र असल्याचं समाधान आईच्या चेह-यावर दिसलं. सुख दु:खात खंबीरपणे एकमेकांना निदान हे पाच भाऊ तरी साथ देतील यावर आईचा विश्वास होताच पण आमच्या येण्याने तो विश्वास अधिकच घट्ट झाला. आईला नेहमी वाटायचं आम्हा, पाच भावंडांमध्ये आम्हाला एक बहिण हवी होती म्हणजे तिने आम्हा भावांना एकसुत्रात बांधून ठेवलं असतं. बहिणीची माया लावली असती, बहिणीच्या मायेने आम्ही जोडले गेलो असतो. कारण आजकाल नात्यांना टिकवून ठेवण्यापेक्षा, मतभेदातून, मनभेदाकडे वळून नातं बिघडवण्याकडे जास्ती कल असल्याचं दिसून येतं. मी माझं माझं . यात गुरफटलेल्या माणसाला अवतिभोवतीचं जग शुन्य वाटतं आणि अहंकार वाढला की नात्याला त्यांच्या लेखी किंमतच उरत नाही. जवळ राहून अनेकदा अस चित्र बघायला मिळतत आम्ही तर खूप दूर होतो. आम्ही तिघेही छोटूच्या तब्बेतीसाठी म्हणून सुट्टया काढून आलोय या विचारानेच आई भारावून गेली. समाधानाचे अश्रू डबडबलेल्या डोळ्यांच्या आड आईने बाहेर येवू दिले नसले तरी चेह-यावरचं समाधान खूप काही बोलून जातं होतं.

माझी पोरं माझा अभिमान आहेत, माझ्या हाताची पाच बोटं, माझी बंद मुट्ठी आहे दादाजीच्या विश्वासाला आम्ही जपलं हे त्यांचेच संस्कार होते. अनेक वर्षात आम्ही असे एकत्र भेटलचं नव्हतो. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरु झालेला संघर्ष, आणि नंतर तुमसरला शिक्षणाच्या निमित्ताने माझ्या सोबत कधी बालू तर कधी जीतू राहायचा. मी तुमसरच्या बाहेर पडल्यावर जीतू सोबत बालू आणि नंतर बालू आणि छोटूने चक्की सांभाळली. शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही तिघेही तुमसर बाहेर पडल्यावर, आमच्या सांगण्यावरुन आईने मुंडीकोट्यातलं चहाचं दुकान बंद केलं. आई दादाजी तुमसरला रहायला आले. आईच्या आयुष्यातला थोडा का होईना संघर्ष कमी झाला होता. घरची परिस्थिती पण सुधारली होती. आता आई घर आणि घरीच असलेल्या चक्कीकडे लक्ष ठेवणे एवढचं काम करायची.

त्यामुळे आम्ही अनेक वर्षात असे एकत्र राहाण्याचा योगचं आला नव्हता, मागिल दहा बारा वर्षांत तर आम्ही साधारण एकत्र सगळे भेटलो ही नव्हतो. तेव्हाच आम्ही ठरवलं दर वर्षी भारतात एक ट्रीप आईवडिलांसोबत काढायची. जेणे करुन त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुलं आपल्याला विसरली नाही तर दूर राहूनही मनाने आपल्या जवळ आहे याचं अलौकीक समाधान त्यांच्या चेह-यावर झळकेल. आणि आम्हाला आईवडिलांच्या चेह-यावर तोच आनंद तेच समाधान बघायचं होतं. आधीही आम्ही अनेकदा प्रयत्न केला होता, पण कुणाचं काय नी कुणाचं काय? कुटूंब मोठं पाच सुना, पाच मुलं, नातवंड, देशविदेशातल्या चार टोकावरच्या चौघांना एकत्र आणणं खूप चॅलंजिंग होतं. सगळी चॅलेंज हसत हसत पेलणारे, यशस्वीपणे पूर्ण करणारे आम्ही आमच्या संपूर्ण कुटूंबासोबत एकत्र नाही भेटू शकलो?

आईच्या सुनांच्या सुट्टया, पोरांचा अभ्यास, कामाच्या जबाबदा-या, वातावरण आणि येणारा खर्च संयोग जुळवून येण्यासाठी कारणे अनेक जबाबदार असली तरी, “इच्छा तिथे मार्ग” पुढे मागे संयोग जवळून येतिलही पण आम्ही आमच्यापासून सुरुवात करायचं ठरवलं.

दर वर्षी आम्ही पाच भाऊ आईदादांसोबत त्यांना जीथे कुठे जायची इच्छा असेल, तिथे घेवून जाऊ. आणि त्यांच्यासोबत पूर्ण वेळ घालवू असं ठरलं. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है। म्हणतात तेच खरं. पैसा, श्रीमंती, ऐश्वर्य सगळं मिळवल्यावर, कधी कधी प्रश्न पडतो जिवन जगण्यासाठी पैसा मबत्वाचा असला तरी, पैसा म्हणजे आयुष्य होऊच शकत नाही. पैसा आणि नाती एका पारड्यात कधीच बसू शकत नाही. पैसा आपली गरज असली तरी, नात्यांना टिकवण्यासाठी अनेकदा पैशातून परिक्षा पाहाण्यात येत असली तरी, पैसा नात्यात आला की तीच नाती कमकुवत होताना दिसतात.

आईला तसा पाच सुनांचा एकत्र सहवास कमीच मिळाला. शिकलेल्या सुना, त्यांचा स्वाभिमान त्याची करियर यात एवढ्या गुरफटल्या की त्यांना नाती जपायला वेळच मिळाला नसेल कदाचित. अनेकदा सासू-सुनांमध्ये दूर देशात राहूनही छोटी मोठी नौक चौक होतेच होते. आई सुनांना आणि सुना अनेकदा आईला समजून घेण्यासाठी असमर्थ ठरतात. आईचा अनुभव आणि काळाची गरज यात तयार झालेली तफावत अनेकदा त्यांच्या मतभेदांचं कारण आणि चर्चेचा विषय असतो. आम्ही ठरवलयं त्यांच्यात ढवळाढवळ करायची नाही. कारण व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारांची प्रगल्भता दोन्हीकडून दाखवल्या गेली तरच नातं टिकतं. आजही जगात सुनेला मुलगी आणि सासूला आई समजणा-या स्त्रीयांचा मोठेपणा प्रत्येक घरात दिसेलच असं नाही. शेवटी काय तर “घरोघरी मातीच्या चुली” म्हणायचं आणि गप्प बसायचं.

अर्धा डझन बायकांच्या संसारात भांड्याला भांड लागणारच, आवाज तो येणारचं. दूर असूनही जवळ असल्याचा भास तो होणारचं. असं आमच्या घरी अनेकदा होतं. दूर राहूनही मनाने जवळ असलेल्या आमच्या घरात बायकांमुळे अनेकदा ऑनलाईनवरही भांडे वाजतातचं. आपण फक्त मज्जा घ्यायची आणि एंजॉय करायचं. आमच्या घरात आईची तिसऱ्या नंबरची सून स्नेहल आईची विशेष लाडकी. आई तिची आणि ती आईची खूप काळजी घेत असल्याने आम्हाला आईची फार काळजी नसते. स्नेहलवरचा विश्वास, तिचा कुटूंबाकडे बघण्याचा दृष्टीकोण, कूटू़ंबाला जुळवून ठेवण्यासाठीची तिची धडपड बघता आमच्या सर्वांना जुळवून ठेवण्यालाठीचा स्नेहल हा नाजूक पण मजबूत धागा आहे असचं मी म्हणेल. आईच्या आयुष्यात लेकीची उनिव मात्र स्नेहल ने भरुन काढली. आईदादाजींची ती घेत असलेली काळजी, कुठलाही जनरेशन गॅपचं तुणतुण न वाजवता, मोठ्यांच्या मताचा आदर करणं हे स्नेहल सहज शिकवून जाते. मन मोठ असलं की सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती आपोआप येतेच.

मला आठवत बालू आमच्या आज्जी आणि आजोबांचा खूप लाडका होता. आणि बालू चाही त्यांच्यावर खूप जीव . तुमसरला मी, बालू आणि आज्जी राहायचो. आमचे आजोबा आजीला आणि बाजूला भेटायला एकटे तुमसरला आले होते. आज्जी आजोबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आज्जी शरीराने आमच्या सोबत राहात असली तरी तिच्या बोलण्यात आजोबांची चिंता आणि गावाची आठवण असायची. आईचं आणि आजीच खूप पटायचं. आजीची आईला मदत करण्याची भावना असायची. तशीच स्नेहल आहे बालूसारखी आमच्या आईदादाजींची लाडकी. मी म्हणेल आमच्या घरातली Made for each other jodi.

मनाचा हळवा कोपरा माणसाच्या आत कुठेतरी खोल असतोच असतो. आपला स्वभाव आरशासारखा त्यातून प्रतिबिंबित होत असतो. तर कधी मनात प्रेम, जिव्हाळा असूनही तो दाखवतो येत नाही. जबाबदा-या आणि त्यातून आलेल्या शहानपणामुळे माणूस कधीकधी कठोर तर कधी मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पडतो. मग ते आमच्यासारखं दूरदेशी जावून स्थाईक होण असू देत किंवा तिथल्या चालीरीतींना आत्मसात करणं असू देत. यालाच जीवन ऐसे नाव. म्हणूया.

Written by: Mrs. Shubhangi Maske

@ 2021 All Rights Reserved www.lakhankar.com